देवदत्तने बनविली इलेक्ट्रिक बाईक परिसरात बनला कुतुहलाचा विषय

0
देवदत्तने बनविली इलेक्ट्रिक बाईक 

परिसरात बनला कुतुहलाचा विषय 


अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता

आज भ्रमणध्वनी प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. प्रत्येकाच्या हातात आज अन्ड्राईड मोबाईल दिसतो. तरुणांपासून वृध्दांपर्यंत सर्वांनाच मोबाईलचे आकर्षण व व्यसन जळले आहे. मोबाईलचे काही दुष्परिणाम आज तरुणांमध्ये पाहायला मिळत असले तरी काही तरुणांसाठी मोबाईल मात्र वरदान ठरला आहे. देसाईगंज तालुक्यातील तुळशी येथिल तरुणाने केवळ मोबाईलवरील युट्युब मधिल व्हिडीओ बघून-बघून चक्क भंगारात पडलेल्या बाईक पासून इलेक्ट्रिक बाईक बनविल्याने सध्या परिसरात कुतुहलाचा  विषय बनला आहे.
  देवदत्त नामदेव बावणे असे या तरुणाचे नाव असून तो बारावी व आयटीआय ट्रॕक्टर मेक्यानिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या देवदत्त आंध्रप्रदेश येथे रोजगारा निमित्त्यानं गेला असता इलेक्ट्रिक बाईक बघीतली व तेव्हा पासून आपणही अशी बाईक बनवायची असे स्वप्न मनात रंगवू लागला. यासाठी स्वप्नाला कृतिची जोड देत युट्युब अॕपवरील व्हीडीओ बघून -बघून देवदत्तने इलेक्ट्रिक बाईक बनविली व आपले स्वप्न पूर्ण केले.
   इलेक्ट्रिक बाईक बनविण्यासाठी देवदत्तने भंगारातील तीन हजार रुपयाची बंद अवस्थेतील बाईक खरेदी केली.१२ होल्ट,२८ एम्पीअर च्या ४ बॕटरी,४८ व्होल्ट ८०० वॕटची डीसी मोटर , ८०० वॕटचा कंट्रोलर , हार्ननेट व वायरिंग खरेदी केली. त्यांची जुळवाजुळव करुन इलेक्ट्रिक बाईक तयार केली. यासाठी साहित्य खरेदी, वेल्डींग खर्च, भंगारातील गाडी खरेदीसाठी लागलेला खर्च व इतर खर्च असा एकुण २५५०० रुपयाचा खर्च ही बाईक बनविण्यासाठी देवदत्तला आला.
   या गाडीचा स्पिड ४०चा असून ६० किलोमीटर इतके मायलेज देते. लोड क्षमता  ३०० कि.ग्रा.आहे.चार्जीग टाईम १० घंटे असून १० घंटे चार्जिगमध्ये ६० किलो मिटर पर्यंत ही इलेक्ट्रिक बाईक धावते. या इलेक्ट्रिक बाईकमुळे हवा प्रदुषण ,ध्वनी प्रदुषण होत नाही. पेट्रोलची बचत होत असल्याने गरीबांना परवडणारी आहे, असे देवदत्तचे म्हणने आहे
 बाजारात अशाप्रकारच्या तयार  इलेक्ट्रिक दुचाकींची किंमत लाख रुपये पर्यंत आहे. उपलब्ध साधनांचा व असलेल्या स्वतःच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेऊन कमीत-कमी खर्चात ही इलेक्ट्रिक बाईक देवदत्तने तयार केली आहे. भविष्यात याच इलेक्ट्रिक बाईकमध्ये सुधारणा करुन  बाईकवर मोबाईल चार्जिंग करणे, सोलर पॕनल आॕपरेट करणे, पाणी उपसा करण्यासाठी व घरीची लाईटची सोय करणे अशी बहु उपयोगी इलेक्ट्रिक बाईक बनविण्याचा देवदत्तचा मानस आहे.देवदत्तने बनविलेली इलेक्ट्रिक बाईक सध्या परिसरात कौतुकाचा विषय झाला असून यासाठी त्याचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !