युवतीने घेतला गळफास

0
युवतीने घेतला गळफास‌‌‌ 

प्रविण तिवाडे उपसंपादक वैनगंगा वार्ता


देसाईगंज येथील आंबेडकर वॉर्डमधील कल्पना केशव शिवूरकर (वय २५ वर्षे) या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घरातील एका खोलीत धान ठेवले आहे. धानाच्या ढिगावर चढून व त्यावर खुर्ची ठेवून गठफास घेतला. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी शवविच्छेदन करण्यात आले. देसाईगंज पोलिस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुजाता भोपळे करीत आहेत. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !