२४ वर्षीय तरुणाचा शेततळ्यात पाय घसरुन दुदैवी मृत्यु

0
अप२४ वर्षीय तरुणाचा शेततळ्यात पाय घसरुन दुदैवी मृत्यु



प्रविण तिवाडे उपसंपादक वैनगंगा वार्ता (वैनगंगा वार्ता न्यूज)

येवला (दि.14 डिसेंबर):- साताळी येथील मनोज सुभाष शिंदे हे शेजारी असलेल्या शेततळ्यावर डोंगळा चालू करण्या साठी गेले असता त्यांचा तोल जाऊन पाय घसरला मुळे तो तळ्यात पडला शेजारी उभा आसलेला त्याच्या भावाने व वडीलानी खूप प्रयत्न केला परंतु त्याला वाचवू शकले नाही.

अखेर मनोज काळाचा पाडद्या आड गेला त्याचा मृत देह काढण्या साठी स्थानिक पोहणारे यांनी पन खूप प्रयत्न केला पन मृतदेह सापडला नाही तब्बल ७ तासानी मनोजचा मृत देह शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले व शव येवला येथील उपजिल्हा रुग्णालयेथे पाठवण्यात आले.

येवला तालुक्याचे तहसीलदार साहेब मा. हिले साहेब व ग्रामीण पोलिस निरीक्षक पाटील साहेब, प्रवीण भाऊ बनकर यांनी देखिल तत्काळ घटना स्थळी धाव घेतली. मनोजचा अशा दुर्दैवी घटनेने साताळी गाव, निमगाव व वनसगाव या तीनही गावात शोकाकु पासरला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !