अवैध दारुसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त; दोन आरोपींना अटक

0
अवैध दारुसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त; दोन आरोपींना अटक

मुलचेरात नाकाबंदी दरम्यान पुन्हा एक कारवाई


प्रविण तिवाडे उपसंपादक वैनगंगा वार्ता

मुलचेरा, 10 डिसेंबर तालुका मुख्यालयात नाकाबंदी दरम्यान मुलचेरा पोलिसांनी पुन्हा एका कारवाईत 4 लाख 49 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात धर्मदास राजाराम हिंगणेकर वय (35) रा. दुधडेरी सावरकर वॉर्ड चंद्रपूर, रामकृष्ण लक्ष्मण सोरते वय (49) रा. चंद्रपूर या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे..

मागील 10 ते 15 दिवसांपासून मुलचेरा पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान लाखो रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे. तालुक्यातील अवैध धंदे असो किंवा सुगंधित तंबाखू आणि अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतल्याने दारू व तंबाखू तस्करांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. 9 डिसेंबर रोजी रात्रीपासून नाकाबंदी सुरु असताना पहाटेच्या दरम्यान एमएच 33 डिके 3031 क्रमांकाच्या टाटा इंडिगो वाहनाला रोखून झडती घेतली असता त्यात 420 संत्रा रॉकेट निपा, किंगफिशर बियर 11 बॉटल, रॉयल स्टंग 2 लिटर क्षमतेचे 4 बॉटल, ऑफिसर चॉईस ब्लू 60 निपा, रॉयल स्टॅग 180 एमएल चे 90 निपा आढळून आले. विशेष म्हणजे यावेळी अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर हे स्वतः उपस्थित होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 99 हजार 300 रुपयांचा दारूसाठा आणि 3 लाख 50 हजार रुपये किमतीचे चारचाकी वाहन असे एकूण 4 लाख 49 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुलचेरा ते आलापल्ली मार्गावर दररोज कारवाई होत असल्याने दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या उपस्थितीत सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर, एसआरपीएफचे पोलीस निरीक्षक साळुंखे, सहाय्यक उपनिरीक्षक रॉय, पोलीस हवालदार विष्णू चव्हाण, पोलीस नाईक गाईन, रोशन पोहणेकर, एसडीपीओ कार्यालयाचे दहिफळे, पाल, पवार, पोलीस अंमलदार जाधव, विक्रांत लांडगे, कठाने, सानप, बिसेन, वेलादी, कदम व महिला पोलीस अंमलदार गोदावरी आणि लांडे उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !