मोठी बातमी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाहिफेक ११ पोलिस कर्मचारी सस्पेंड

0
मोठी बातमी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाहिफेक ११ पोलिस कर्मचारी सस्पेड

प्रविण तिवाडे उपसंपादक वैनगंगा वार्ता 

मुंबई/पुणे: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या
चेहऱ्यावर शनिवारी संध्याकाळी पिंपरी-चिंचवड येथे समता सैनिक दलाच्या एका कार्यकर्त्याने शाई फेकली होती. पोलिसांची सुरक्षा भेदून समता दलाचे कार्यकर्ते चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचले होते आणि त्यांनी थेट पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता गृहमंत्रालयाकडून त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. शाईफेक प्रकरणात ११ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये ८ पोलीस कर्मचारी आणि तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारने चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीचे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे. याप्रकरणी आता पोलिसांच्या ताब्यात असलेल्या समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले.

शाईफेक झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी काहीवेळातच प्रसारमाध्यमांसमोर येत आक्रमकपणे प्रतिक्रिया दिली होती. माझ्यावर असे भ्याड हल्ले झाले तरी मी घाबरणार नाही. विरोधकांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी माझ्यासमोर येऊ दाखवावे, असे चंद्रकांत पाटील यांनी त्वेषाने सांगितले होते. चंद्रकांत पाटील हे शनिवारी मोरया गोसावी महोत्सवासाठी आले होते. या कार्यक्रमाला जायच्या आधी ते कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. कार्यकर्त्याच्या घरातून निघताना चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली. ही शाईफेक झाल्यानंतर शाई फेकणाऱ्यांनी 'निषेध असो, निषेध असो', 'चंद्रकांत पाटील यांचा धिक्कार असो', 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचा विजय असो, महात्मा फुले यांचा विजय असो', अशा घोषणा दिल्या होत्या.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !