वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

0
वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

आंबेशिवणी येथील सोनम उंदिरवाडे या महिलेवर वाघाने केला होता हल्ला 

प्रविण तिवाडे उपसंपादक वैनगंगा वार्ता 

गडचिरोली, 9 डिसेंबर वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आंबेशिवणी येथील महिला सोनम उंदरवाडे यांची अखेर मृत्यूशी संपली असून शुक्रवार 9 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास नागपूर मेडीकल कॉलेज मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या आंबेशिवणी परिसरात 4 डिसेंबर रोजी वाघाच्या हल्ल्यात सोनम उंदिरवाडे (25) हया जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर नागपूर मेडीकल कॉलेज मध्ये उपचार सुरु होता. मात्र 4 तारखेपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या सोनम उंदिरवाडेचा शुक्रवार 9 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास मृत्यू झाला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !