मनुष्य जीवनात आणि खेळात प्रेरणेचे ( motivation) महत्त्व
या विषयावर एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा
(प्राध्यापक रवि गुलाबराव गजभिये)
प्रविण तिवाडे उपसंपादक वैनगंगा वार्ता
आष्टी येथील खेलो इंडिया धनुर्विद्या प्रशिक्षनार्थीना
गडचिरोली जिल्ह्यात येत असलेल्या आष्टी येथे भारतीय खेळ प्राधिकरण द्वारा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने केंद्र तथा राज्य सरकारच्या मान्यतेनुसार खेलो इंडिया अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी येथील जिल्हयात नावलौकिकास आलेल्या खेलो इंडिया सेंटर महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी येथे खेलो इंडिया धनुर्विद्या प्रशिक्षणार्थीना
मनुष्य जीवनात आणि खेळात प्रेरणेचे ( motivation) महत्त्व
या विषयावर एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल चे श्री. सुशील अवसरमोल होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. संजय फुलझेले उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक प्रा. रवी गजभिये इंग्रजी विभाग प्रमुख महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी यांनी खेळाडूंना आपल्या आयुष्यात पुढचं ध्येय गाठण्यासाठी मनात इच्छा व जिद्द असणे कसे आवश्यक आहे. तसेच आरोग्य हेल्दी राहण्यासाठी नियमित योग्य आहार व व्यायाम करणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर फिजिकल कॅप्यासिटी मेन्टेन करण्यासाठी मेंटल कॅप्यासिटी असणे आवश्यक आहे व फिजीकल फिटनेस साठी सतत प्रयत्न करत राहाल तर एक दिवस नक्की फळ मिळेल . तसेच त्यांनी प्रोजेक्टर द्वारे अरूनिमा सिन्हा व निक वूजीसिक यांची उदाहरण देऊन खेळाडूंना मोटिवेट केले. कार्यक्रमांचे प्रमुख अस्थिती श्री. सुशील अवसरमोल यांनी देखील खेळाडूंना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.राज मुसणे, प्रा. डॉ. भारत पांडे, प्रा.डॉ. रवी शास्त्रकार, प्रा. डॉ. गणेश खुणे, प्रा. ज्योती बोबाटे, प्रा नासिका गभने,प्रा. सालूरकर, तसेच धनुर्विद्या खेळातील कलरकोट खेळाडू नितेश डोके, अरविंद वनकर, पूजा डोर्लीकर, फेमा सोमनकर, शुभांगी महोरकर,प्रज्ञा चांदेकर, वैष्णव बावणे, मंगेश कस्तुरे, तसेच कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी श्री. राजकुमार लखमापुरे, श्री. संतोष बारापत्रे, श्री. निलेश नाकाडे, श्री. लोमेश गुटके श्री.बछाड, श्री मुस्ताक, श्री. अल्लीउल्लाखान पठाण, श्री विनोद तोरे व इतर प्रशिक्षणार्थी विद्यार्थी तसेच आजूबाजूच्या खेड्यातील खेळाडू उपस्थित होते. तर कार्यक्रमचे सूत्रसंचालन प्रा. श्याम कोरडे तर आभार महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी येथील माजी धनुर्विद्या खेळाडू कुमारी कौमुदी श्रीरामवार हिने मानले तर कार्यक्रमाची सांगता हे वंदे मातरम या गीतांनी पार पडले


