रेतीपायी एकाचा जीव गेला, पण इकडे पोलिसांची वसुली थांबेना!

0
रेतीपायी एकाचा जीव गेला, पण इकडे पोलिसांची वसुली थांबेना!

काला धंदा 'गोरे' लोग

प्रविण तिवाडे उपसंपादक वैनगंगा वार्ता 

चिखली, दि. ८

रेतीचे अवैध उत्खनन आणि वाहतुकीला उधाण आले असून ही वाळू अनेकांच्या मुळावर उठली आहे. पोलीस आणि महसूल विभागच रेतीमाफियांचा पाठीराखा बनला आहे. देवाण-घेवाणीने खडकपूर्णा नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पण, दोन नंबरचा धंदा करणाऱ्या रेतीतरकरांसह प्रशासनाला त्याचे काहीच सोयरसुतक नसल्याची चर्चा तालुक्यात होत आहे. दोन दिवसांपूर्वी देऊळगाव राजा तालुक्यातील सुलतानपूर येथे रेती वाहतुकीला विरोध केला आहे. म्हणून वृद्धाला जीवाने ठार मारण्यात आले. रेतीपायी एकाचा नाहक बळी गेला तरी, इकडे रेतीमाफियांकडून पोलिसांची वसुली काही थांबताना दिसत नसल्याचे बोलल्या जात आहे.

रेतीच्या माध्यमातून आपले उखळ पांढरे करवून घेण्यासाठी दोन पोलीस कर्मचा-यांच विशेष नेमणूक करण्यात आली आहे. चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू | असलेले अवैध धंदे पाहता 'काला धंदा 'गोरे' लोग', असेच विरोधाभासी चित्र सध्या दिसून येत आहे. अवैध रेतीच्या माध्यमातून तर अनेक जण गब्बर झाले आहेत. रेतीसाठी महसूल आणि पोलीस या दोन्ही ठिकाणी हप्ते बांधण्यात आल्याचे लोक खुलेआम बोलत आहेत. दोन्ही विभागांचे पाठबळ रेतीमाफियांचे मनोबल उंचावणारे ठरले

'बापू' लोकांच्या साथीने वसुलीचे अधिकार त्यांच्यावरीलदेखील जाम खूश असतात. रेतीमाफियांच्या खिशातून ही वसुली काढली जात आहे. नुकतेच देऊळगाव राजा तालुक्यातील सुलतानपूर येथे एका वृद्धाचा रेतीला विरोध केला म्हणून खून करण्यात आला. वृद्ध शेतकऱ्याच्या शेतातून रेतीने भरलेले ट्रक नेले जात होते. त्यामुळे शेतीची वाट लागली होती. याविरोधात शेतकरी पेटून उठला. मात्र, त्याच्या अंगावर बोलेरो गाडी घालून त्याला संपवण्यात आले. केवळ रेतीमुळे एकाचा बळी गेल्यानंतरही रेतीची एवढी तस्करी वाढली असताना 'वसुली'त मग्न असलेल्यांवर काही परिणाम केवळ 'हप्त्या' मध्येच सर्वांचे हात बांधले. झाला नसल्याचीदेखील चर्चा यानिमित्त होऊ गेल्याची चर्चा जनतेत आहे. 'गोऱ्यांना लागली आहे.

टिप्परने उडवले; मृत्यूचे प्रकरण निपटले

शरदाचे चांदणे ओसरल्यावर रेतीचा काळा व्यवसाय तेजीत येतो आणि तेथूनच 'गोप्य'चे राज्य सुरू होते. या अवैध व्यवसायाचा 'रात्रीस खेळ चालत' आहे. रेतीच्या प्रत्येक गाडीकडून १२ हजारांची दक्षिणा घेतली जाते. तीन दिवसांपूर्वी शेलगाव जहागीर येथील एकाला रेतीच्या टिप्परने धडक दिली. त्यात त्याचा जीव गेला. मात्र, या प्रकरणाचा जास्त गाजावाजा होऊ देता ते निपटण्यात आले.

पाच बोटींद्वारे उत्खनन

इसरूळ परिसरात पाच बोटीद्वारे रेतीचे अवैध उत्खनन केले जात आहे. मात्र, त्यावर कायद्याचा कुठलाही बडगा उगारला जात नसल्याने माफियांमध्ये आपसांत जंगी भांडणे होत आहेत. डिग्रस व चिखली येथील काही रेतीमाफिया त्यात सामील असून आपल्याच गाड्या जास्तीत जास्त कशा चालतील यासाठी प्रसंगी हाणामारीदेखील होते. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांची रात्रभर ड्युटी असतानादेखील रेती वाहतूक सुरुच असल्याची माहिती आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !