दोन ट्रकांची जुडली मैत्री घेतले आंलींगन दिना नदीच्या पुलावर घडली मिलनभेट

0
दोन ट्रकांची जुडली मैत्री घेतले आंलींगन


दिना नदीच्या पुलावर घडली मिलनभेट


अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता

मानवांची जशी एकमेकांशी मैत्री होते व जेव्हा ते एकदम समोरासमोर येतात आणि  एकमेकांना आंलींगन देतात त्याच प्रकारे बोरी जवळील दिना नदीच्या पुलावर दोन ट्रकांची भेट झाली व अशी मैत्री जिवाभावाची होती की त्यांनी गळाभेट घेतली मात्र गळाभेट अशी झाली की समोरचा ट्रक नदीच्या पुलावरून पात्रात कोसळता कोसळता वाचला .
सदर घटना काल दि. सात नोव्हेंबर सायंकाळी ५.३०  वाजता चे सुमारास सुरजागड येथील लोहखनिज वाहतूक करणाऱ्या दोन ट्रक मध्ये एकमेका सोबत जबरदस्त धडक झाली परंतू जिवितहानी झाली नाही व सुदैवाने चालक सुखरूप बचावले व बाहेर आले. एक ट्रक नदीच्या पुलावरून पात्रात कोसळता कोसळता वाचला यावेळी आलापल्ली ते चंद्रपूर वाहतूक बरेच काळ ठप्प झाली होती  


या अपघातातील एक ट्रक त्रिवेणी कंम्पणीच्या मालकिचा तर दुसरा चड्डा ट्रान्सपोर्टचा असल्याची विस्वासनिय सुत्रांकडून समजते आहे.
तात्काळ घटनास्थळी पोलिसांनी पोहचून दोन्ही गट्टी जमलेल्या ट्रकांना नदिपुलावरुन बाहेर काढून रस्ता खुला केला. 
प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !