अहेरी तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी डॉ.अब्दुल निसार
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
अहेरी तालुका काँग्रेस अध्यक्ष पदावर डॉ.अब्दुल निसार (पप्पु हकीम) यांना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नियुक्ती केले आहे.
नवनियुक्त अध्यक्ष हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदिवासी सेवक बबुजी हकीम यांचे मानसपुत्र असून लहान वयातच त्यांना समाजकारणाचे व काँग्रेसच्या विचारधारेचे बाळकडू बबूजी हकीम यांच्या माध्यमातून लाभलेले आहे. तरुणपणातच ते एन.एस. यु. आय. च्या माध्यमातून आपल्या कार्याची सुरुवात केली.त्यानंतर त्यांच्या एन.एस. यू. आय. च्या कार्याची दखल घेऊन युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्यातून पक्ष संघटनेचे काम भक्कमपणे पार पाडले. आणि याच कार्याची पावती म्हणून प्रदेश काँग्रेसचे निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांनी तालुका अध्यक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे. निश्चितच डॉ.निसार हकीम यांची नियुक्ती अहेरी तालुक्यात नवसंजीवनी आणि नवचैतन्य निर्माण करणारी ठरणार आहे.
आपल्या निवडीचे श्रेय प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे, ज्येष्ठ नेते माजी खासदार मारोतराव कोवासे, प्रदेश आदिवासी काँग्रेसचे नामदेवजी उसेंडी, माजी आमदार आनंदरावजी गेडाम, महासचिव पंकजभाऊ गुड्डेवार, जिल्हा प्रभारी नामदेवजी किरसान, प्रदेश सदस्य तथा माजी जिल्हाध्यक्ष हसनभाई गिलानी, प्रदेश सचिव डॉ.नितीनजी कोडवते, प्रदेश सचिव सौ.डॉ.चंदा कोडवते, माजी आमदार पेंटा रामा तलांडी,प्रदेश प्रतिनिधी तथा जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शमशेरखानजी पठाण, सोशल प्रदेश सचिव नंदुजी वाईलवार, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीशजी विधाते, अनुसूचित सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, माजी जिल्हाध्यक्ष मुस्ताकभाऊ हकीम तसेच अहेरी तालुक्यातील समस्त सन्माननीय यांना दिलेले आहे.
यांच्या नियुक्तीचा आनंद कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी तसेच मित्रमंडळी जल्लोषात स्वागत केले.

