अ. भा.रिपब्लिकन पक्षातर्फे सोमवारी मंगळवेढा प्रांत कार्यालयावर गाढव मोर्चा

0
अ. भा.रिपब्लिकन पक्षातर्फे सोमवारी मंगळवेढा प्रांत कार्यालयावर गाढव मोर्चा



अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता


मंगळवेढा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे वतीने मंगळवेढा प्रांत कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकारचा महसूल बुडविण्याकरिता व वेळ खराब करण्याकरिता जाणीवपूर्वक खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून महसूल प्रशासनाची पर्यायाने महाराष्ट्र शासनाची फसवणूक करणाऱ्या मौजे शेलेवाडी येथील श्रीमती सुनिता ज्ञानू डांगे व तिला सहकार्य करणाऱ्या मौजे डोंगरगाव येथील सौ. विमल सत्यवान खडतरे यांच्या विरुद्ध शासनामार्फत तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा या प्रमुख मागणीसह अन्य मागाण्यांकरिता सोमवार दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजता मंगळवेढा येथील संत दामाजी चौकातून प्रांत कार्यालयावर अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष व अन्य समविचारी पक्ष संघटनाच्या वतीने मंगळवेढा प्रांत कार्यालयावर भव्य गाढव मोर्चा काढणार असल्याचे निवेदन पक्षाचे प्रदेश सचिव डी. के. साखरे यांनी विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी सोलापूर व प्रांत अधिकारी मंगळवेढा यांचे सह अन्य संबंधितांना दिले आहे.
      याबाबतचे सविस्तर वृत्त असे की मौजे शेलेवाडी येथील ज्ञानू मारुती डांगे हे दिनांक 11 ऑक्टोबर 2021 रोजी मयत असून त्यांचे पश्चात एकूण 4 कायदेशीर वारस असताना पत्नी सुनीता डांगे हिने तिची मुलगी सौ. विमल सत्यवान खडतरे व निवासी नायब तहसीलदार एस. एच. धाईंजे यांच्याशी संगनमत करून दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजी मयत ज्ञानू मारुती डांगे यांना मुलगी हे आपत्य झाले नाही. असे खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून सौ. विमल सत्यवान खडतरे हिचा जन्मच नाकारला.
              खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून महाराष्ट्र शासनाची फसवणूक करणाऱ्या सुनीता डांगे व तिला सहकार्य करणारे तिची मुलगी विमल सत्यवान खडतरे यांचे विरुद्ध शासनामार्फत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून पक्षाच्या वतीने 26 सप्टेंबर 2022 पासून जिल्हा युवक अध्यक्ष अशोक रणदिवे, जिल्हा महिला अध्यक्ष वैशाली चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. तसेच मा. विधी अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांनी दिनांक 28 ऑक्टोबर 2022 च्या पत्रान्वये  सुनीता डांगे विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे अभिप्राय प्रांत अधिकारी मंगळवेढा व तहसीलदार मंगळवेढा यांना कळविले आहेत.परंतु यामधील प्राधिकृत अधिकारी एस. एच. धाईंजे यांची मानसिकता ही कायद्याच्या व नियमांच्या विरुद्ध असून युक्त्या -कुयुक्त्या करून श्री धाईंजे हे सुनीता डांगे व विमल खडतरे यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !