रानटी हत्तीचा पहिला बळी
रानटी हत्तीचा हल्ल्यात ईसम ठार
मानव वन्यजीव संघर्ष शिगेला
उपसंपादक प्रविण तिवाडे वैनगंगा वार्ता
गडचिरोली, 6 नोव्हेंबर : जिल्ह्यातील गडचिरोली व वडसा वनविभागात धुमाकूळ माजवणाऱ्या हत्तीच्या कळपाने एका इसमास चिरडून ठार केल्याची घटना उघडकीस आली असून हत्तीच्या हल्ल्यात जिल्ह्यात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. सदर घटनेने एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. धनसिंग धरमु टेकाम रा. तलवारगड ता. कोरची असे मृतकाचे नाव
आहे. प्राप्त माहितीनुसार, मुरुमगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत येत
असलेल्या कोरची तालुक्यातील तलवारगड गाव परिसरात हत्तींच्या कळपाने शुक्रवारी रात्रोच्या सुमारास प्रवेश करत धुमाकूळ माजवला. या दरम्यान धनसिंग टेकाम यांना हत्तीने चिरडले यात त्यांचा मृत्यू झाला.

