दोन वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करणार्या आरोपिच्या आवळल्या मुसक्या

0
दोन वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करणार्या आरोपिच्या आवळल्या मुसक्या
संपादक अशोक खंडारे वैनगंगा वार्ता

एट्टापल्ली5 नोव्हेंबर : दोन वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून तीन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपी सुंदरसाई घिस्सो मडावी (25) रा. करपनफुंडी ता. एटापल्ली जि. गडचिरोली याच्या मुसक्या आवळण्यात अखेर गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.

आरोपी सुंदरसाई घिस्सो मडावी याने 2 वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग केला याबाबत त्याविरोधात पोलीस स्टेशन एटापल्ली येथील अप.क्र. 040 / 2022 कलम 376 (2) (जे), 376 (एबी), भादंवि, सहकलम 4, 6 पोस्को अॅक्ट अंतर्गत गुन्ह्या दाखल होता. तेव्हापासून 03 महिन्यांपासून तो फरार झाला होता. तो नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील भाग असलेल्या येलचिल, बुर्गी, ताडगाव अशा वेगवेगळ्या जंगल परिसरामध्ये लपुन बसला असल्यामुळे व हा परिसर नक्षलदृष्ट्या अतिप्रभावीत असल्यामुळे त्याचा शोध घेण्यास पोलीसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. अखेर 3 नोव्हेंबर रोजी पोलीसांनी गोपनिय यंत्रणा सक्रीय करुन व गुप्त माहितीच्या आधारे अभियान राबवुन आरोपी सुंदरसाई मडावी यास करपनफुंडी गावात पकडून अटक करून जिल्हा सत्र व विशेष न्यायालय, गडचिरोली येथे पोलीस कस्टडी रिमांड घेण्याकरिता हजर करण्यात आले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल सा. व अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा. यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, हेडरी बापुराव दडस यांच्या नेतृत्वाखाली

पोउपनि श्रीकृष्ण शिंदे पोलीस मदत केंद्र बुर्गी, पोउपनि संदिप व्हसकोटी व पोमके बुर्गी येथील पोलीस अंमलदार यांच्या टिमने केली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !