राज्य राखीव पोलीस दलात रक्तदान शिबिर

0
राज्य राखीव पोलीस दलात रक्तदान शिबिर


अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता

गडचिरोली जिल्ह्यातील
 राज्य राखीव पोलीस बलातील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांची सामाजिक बांधिलकी वाढावी तसेच जनता व पोलीस दल यांचेमध्ये सलोखा वृधिंगत व्हावा याकरीता गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागामध्ये समादेशक विवेक मासाळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13 विसोरा येथे पोलीस अधिकारी, पोलीस अमंलदार, लिपीक कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व त्यांचे कुटूंबिय यांच्याकरीता जिल्हा रक्तपेढी गडचिरोली, ग्रामिण रुग्णालय वडसा व प्राथमिक आरोग्य केन्द्र सांवगी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर व विना शुल्क महीलांचे आरोग्य तपासणी तसेच रक्त चाचणी शिबिराचे आयोजन आज करण्यात आले.
            गडचिरोली जिल्ह्यातील गरीब व गरजू आजारी रुग्णांना वेळेवर रक्ताची गरज भासल्यास जिल्हा सामान्य रुग्णालय येथे तात्काळ उपलब्ध याकरीता गटा मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरामध्ये 86 पोलीस अमंलदार यांनी रक्तदान करून आदर्श निर्माण केला. तसेच Complete Hemogram, Lipid Profile, Kidney Function Test, Liver Function Test, Calcium Total, Vatamine D Tatal, Thyroid Profile Total & TSH, HbAlc, Blood Gloocose Fasting, Sodium Serum, Potassium Serum सारख्या पोलीस अधिकारी अमंलदार, लिपीक कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व कुटूंबियाची विनाशुल्क रक्त चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसेच शासकिय निवास्थानातील 71 महीलांची "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" या योजने अंतर्गत विनाशुल्क वैद्यकिय आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आला.
            सदर शिबिरामध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13 विसोरा येथिल गटाचे समादेशक सहाय्यक डी. एस. जांभूळकर, पो. नि. एस. एन. गाडेकर, पो.नि. पी. डी. एकोणकर, पोउपनि / एन. आर. फणसे, पोउपनि एस डी तितिरमारे, पोउपनि /सी. एच. धनविज व पोलीस अमंलदार, लिपीक वर्गीय कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व शासकिय निवास स्थानातील पोलीस कुटूंबियांनी यांनी उस्फुर्त सहभाग दर्शविला.
            भविष्यातही राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13 वडसा जि. गडचिरोली येथे पोलीस अधिकारी, अंमलदार, कुटंबियांचे तसेच आजू बाजूच्या गावामधील जनतेसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याबाबत रारापोबल गट क्र. 13 चे समादेशक सहाय्यक दशरथ एस. जांभुळकर यांनी सांगीतले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !