शिक्षणासह स्वयंम रोजगार करणाऱ्या गणेश चा सत्कार

0


शिक्षणासह स्वयंम रोजगार करणाऱ्या गणेश चा सत्कार

उपसंपादक प्रविण तिवाडे वैनगंगा वार्ता 

कुरुड (वैनगंगा वार्ता) :-
         घराची परिस्थिती हलाकीची असल्याने अनेक मुलं शिक्षण सोडून कुटुंबीयांच्या उदरनिर्वासाठी रोजगार करतात. मात्र शिक्षणासोबतच स्वयंम रोजगार  करणाऱ्या गणेश मेश्राम चा सत्कार श्री साईबाबा देवस्थान गांधी वार्ड देसाईगंज च्या वतीने दि. 11 नोव्हेंबर 2022 ला करण्यात आले.
         सविस्तर असे की, गणेश रविंद्र मेश्राम हा बी.ए. प्रथम वर्षांचा विद्यार्थी असून तो अनिकेत समाजकार्य महाविद्यालय येथे शिक्षण घेऊन आपल्या वडीलाच्या आरमोरी रोड वरील सुरेश वॉच सेंटर समोरील चाय च्या दुकानात चाय विक्री करून स्वयंम रोजगार करतो. अश्या शिक्षणासह रोजगार करणाऱ्या विद्यार्थीच्या कार्याची दखल श्री साईबाबा देवस्थान गांधी वार्ड चे संस्थापक श्री मिलिंद सपाटे यांनी घेऊन त्याचा पुष्प गुच्छ, वही, बुक, पेन व आर्थिक मदत देऊन केला.
         यावेळी पत्रकार राजरतन मेश्राम, घनश्याम कोकोडे, प्रकाश दुबे, पोलीस दक्षता पीपल असोसिएशन चे प्रदेश सचिव मनोज ढोरे, मुख्याध्यापक श्री लांडगे सर व गणेशचे मित्र उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !