ब्रेकिंग न्यूज मोठी बातमी कोळसा खाणीचे वेकोली व्यवस्थापक ५०,०००रुपयाची लाच घेताना सिबिआयच्या जाळ्यात

0

वैनगंगा वार्ता 19/ ११-११-२०२२

ग्रॅच्युइटीची २० लाखाची रक्कम देण्याकरिता घेतली लाच.

उपसंपादक प्रविण तिवाडे वैनगंगा वार्ता

चंद्रपूर-: वेकोली मधील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून ५०,००० ची लाच घेताना महाकाली भूमिगत कोळसा खाणीच्या व्यवस्थापक एस. एम. धांडे यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नागपूर केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) ने केली आहे. कारवाईनंतर आरोपी व्यवस्थापकांच्या घराची आणि कार्यालयांची झडती घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील आणि शहराला लागून असलेल्या महाकाली भूमिगत कोळसा खाणीतून सेवानिवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याला कोल कडून ग्रॅच्युइटी म्हणून २० लाख रुपये द्यायचे होते. महाकाली खानीचे व्यवस्थापक एस. एम. धांडे यांनी ग्रॅच्युइटी मंजुरीसाठी ५० हजाराची लाचीची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सीबीआय नागपूरकडे तक्रार दाखल केली.

काल गुरुवारी सीबीआयने सापडा रुचून खाणीजवळ व्यवस्थापक धांडे याला ५०००० ची लाच घेताना रंगेहात अटक केली. त्यानंतर आरोपी व्यवस्थापकांच्या घराची आणि कार्यालयाची झेडती घेण्यात आली. मागील दोन महिन्यात सीबीआयने वेकोलीच्या अनेक लाचखोर अधिकाऱ्यांना पकडले आहे. सीबीआयच्या कारवाईमुळे वेकोली मध्ये खळबळ उडाली आहे.घुसखोरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची तक्रार सीबीआयने मागविली असल्याची माहिती आहे. सीबीआय उपमहानिरीक्षक एम. एस. खान यांच्या मार्गदर्शनात या घटनेचा तपास सुरू आहे..

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !