चारगाव वायगाव मार्गावर दगडाने ठेचून ५५ वर्षाच्या व्यक्तिचा खून

0

उपसंपादक प्रविण तिवाडे वैनगंगा वार्ता

वैनगंगा वार्ता न्यूज

वरोरा -: वरोरा तालुक्यातील चारगाव - वायगाव मार्गावरील झुडपात एका 55 व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

मृत हा भेंडाळा येथील रहिवाशी असून सदाशिव महाकुडकर त्याचे नाव आहे. शरीरावरील जखमावरून त्याचा दगडाने ठेचून खून केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. शेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी सदाशिव महाकुडकर गुरुवारी सकाळी न्यायालयीन काम असल्याचे सांगून वायगाव येथील नातेवाईकाकडे जात असल्याचे सांगून बाहेर पडला होता. परंतु तो नंतर आपल्या घरी पोहोचला नाही. दरम्यान शनिवारी सकाळच्या सुमारे चारगाव - वायगाव मार्गावरील एका झुडपात त्याचा मृत्यू देह नागरिकांना आढळून आला. या घटनेची माहिती शेगाव पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार अविनाश मेश्राम हे तातडीने आपल्या सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.


सदाशिव महाकुडकर यांना दारूचे व्यसन होते. तसेच त्यांच्याजवळ पैसे होते. पैशातून त्यांच्यावर हल्ला झाला असावा अशी चर्चा आहे. घटनेची गांभीर्य ओळखून तपासासाठी चंद्रपूर येथून श्वान पथक बोलाविण्यात आले, परंतु आरोपीचा शोध लागला नाही. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली शेगावचे पोलीस निरीक्षक अविनाश मेश्राम, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, पोलीस उपनिरीक्षक महादेव सरोदे, विठ्ठल वैद्य, राकेश तुराणकर, मदन येरणे, पुरुषोत्तम दातारकर करीत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !