वनजमिनीत पिकविलेले धान्य होणार खरेदी
आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाना यश
वन जमीनीच्या पट्ट्यासाठी प्रयत्नशील
वनजमिनित पिकविलेल्या धानाची खरेदी होत नव्हती त्यामुळे शेतकरी किमान आधारभूत किंमतीच्या योजनेपासुन वंचित राहत होते. आता मार्ग सुकर झाले असून अहेरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या पाठपुराव्याला व सातत्यपूर्ण प्रयत्नाला यश आले आहे. आता वनजमिनित पिकविलेल्या धानाचीही खरेदी होणार आहे. तसे आदेश संबंधित विभागाला अन्न व नागरी पुरवठा विभागाने 11 नोव्हेबर 2022 ला जारी केले.
गडचिरोली जिल्हा आदिवासी बहुल व जंगलव्याप्त असून येथील मुख्य व्यवसाय शेती असून प्रमुख पिक धान आहे. धानाचे उत्पादन घेऊनही असंख्य वनजमिनिवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांना धानाची कवडीमोल भावात विक्री करावे लागत होते. त्यासाठी असंख्य शेतकरी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना सदर प्रश्न सोडविन्यासाठी अनेकदा निवेदने दिले. निवेदनाची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी धडपड केले असून अखेर विषय मार्गी लावले.
वनदाव्यानुसार वनजमिनिवर धानाचे पिक घेतलेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हाधिकारी हे राज्य को-ऑप मार्केटिंग फेडरेशन, आदिवासी विकास महामंडळ आणि Neml यांच्याकडे पाठवतील सदर शेतकऱ्यांची ऑनलाइन पोर्टलवर नावाची नोंद होऊन धान खरेदीचे लाभ मिळणार आहे.
वनजमिनिवर धान खरेदी करण्याचे राज्यशासनाचे निर्णय निर्गमित झाल्याने आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे असंख्य शेतकऱ्यांनी आभार मानून आनंद व्यक्त केला आहे.
वनजमिनीचे पट्टे प्राप्त व्हावे यासाठीही प्रयत्नशील
वनजमिनीचे पट्टे आदिवासी गैरआदिवासीना प्राप्त व्हावे यासाठी आमदार म्हणून मी व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम प्रयत्न करीत असून कित्येकांना पट्टे प्राप्त झाले पण अजुन बहुतांश शेतकरी व नागरिकांना वनजमिनीचे पट्टे न मिळाल्याने कागदपत्रांची पूर्तता व तृटया दुरुस्तीचे मिशन स्वतः माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम राबवित आहेत. परिश्रम घेत आहेत. वनजमीनिवरील शेती नियमाकूल व पट्टे प्राप्त व्हावे यासाठी आम्ही कसोशिने प्रयत्नरत आहोत.
धर्मराव बाबा आत्राम
आमदार, अहेरी.

