मानवविकास मिशनची बस घुसली शेतात
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
सिरोंचा तालुक्यातील व्यंकटापुर येते मानवविकास मिशन अंतर्गत टेकडा ते सिरोंचा पर्यन्त विद्यार्थ्यांना नेणारी अहेरी आगाराची बस सिरोंचा ते टेकडा जात असतांना व्येंकटापूर जवळ टिक सकाळी 7.10 वाजता स्टेरिंगच्या बिघाडामुळे रस्त्याच्या खाली शेतात घुसली गेली मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. हीच बस दिवाळी पूर्वी सुर्यापल्ली येथेही असीच घुसली होती .
अशा घटने मागे नेमका कोण कारणीभूत असेल ? अहेरी बस डेपोचे अधिकारी बसची दुरुस्तिकडे लक्ष देत नसावेत का ?बस चालक किंवा रस्त्यावरील खड्डे असेल का? एखाद्या वेळेला जर शाळेचे मूल प्रवासात असतांना जर अशाप्रकारे झाल्यास कोण जबाबदार राहणार ? इथले आगार प्रमुख का ? मानवविकास मिशनाचे अधिकारी का ? राजकीय पुढारी का? वाहतूक व्यवस्था का? या सर्व करणाकडे जनतेने व पालक वर्गाने लक्ष देऊन या बेजबाबदारी अधिकारी वर्गाच्या झोप उडवून यांना धडा शिकवणे जरुरीचे आहे. नाही तर भविष्यात अशा प्रकारचे घटना घडून लोकांना विद्यार्थ्यांना आपले प्राण गमवावे लागेल हे मात्र नक्की.

