नराधम बापाला मुलासह सुनेने केले ठार दोघांना अटक धक्कादायक घटना

0
नराधम बापाला मुलासह सुनेने केले ठार
दोघांना अटक
धक्कादायक घटना


अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता



मूर्तिजापूर तालुक्यातील व बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोरेगाव (पुंडलिक महाराज) या गावात काल रात्री धक्कदायक घटना समोर आलीय, या गावात मुलाने आणि सुनेने 60 वर्षीय बापाला ठार करून त्याचावर डीझेल टाकून जाळले. विनोद मारोती चोपडे व सौ. शालू विनोद चोपडे असे आरोपींचे नाव असून दोघांही बोरगाव मंजू पोलिसांनी अटक केली असून त्यांनी गुन्हा कबूल केल्याचे समोर आले आहे. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मूर्तिजापूर येथून जवळच असलेल्या गोरेगाव (पु.म) येथे एक इसम जळालेल्या परिस्थितीत मृतावस्थेत पडला असल्याची माहिती बोरगाव मंजू पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुनील सोळके यांना मिळाली घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी तात्काळ घटना स्थळ गाठले असता तेथे एक इसम जळालेल्या अवस्थेत मृत्यू पावला असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी अधिका तपास केला असता सदर इसम हा 60 वर्षीय मारोती गेदाजी चोपडे राहणार गोरगाव येथीलच असल्याचे तपासात निष्पन्न झाले.


पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता मृतदेहाच्या पार्श्वभागावर धारदार शस्त्राने हल्ला करून मग मृतदेह जळून टाकल्याचे निर्शनात येताच पोलिसांनी आपले तपास चक्र फिरविण्यास सुरुवात केली असता मृतक मारोती चोपडे याचा मुलगा 48 वर्षीय विनोद मारोती चोपडे याच्यावर संशयाची सुई येऊन ठेपली .

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !