नक्क्षल्यानी केली इसमाची गोळी झाळून हत्या
एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा येथील घटना
उपसंपादक प्रविण तिवाडे वैनगंगा वार्ता
गडचिरोली(वैनगंगा वार्ता), 9 नोव्हेंबर : जिल्ह्यात नक्षल्यांनी पुन्हा डोके वर काढत एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा येथे इसमाची गोळी झाडून हत्या केल्याची घटना सोमवारी रात्रोच्या सुमारास घडली. दिलीप उर्फ नितेश गज्जू हिचामी (25) रा. झुरी ता. एटापल्ली जि. गडचिरोली असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. सदर घटनेने परिसरात एकच खळबळ आहे.
उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीमध्ये 11 ऑक्टोबर रोजी लड्डेरा (हेटाळकसा) जंगल परिसरात नक्षल्यांनी पोलिसांना पथकांना नुकसान पोहचून मोठा घातपात करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात दारुगोळा, स्फोटक व इतर साहित्य पुरुन पुरुन ठेवले असल्याच्या गोपनिय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथक गडचिरोली व बी.डी.डी.एस. पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना एका संशयीत ठिकाणी लपवुन ठेवलेले स्फोटके व इतर साहित्य शोधुन काढण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांना यश आले.

