गडचिरोली विद्युत विभागात कार्यरत सहायक अभियंता यांची गळफास घेऊन आत्महत्या

0
गडचिरोली(वैनगंगा वार्ता) : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभाग कार्यरत सहाय्यक अभियंत्याने कार्यालयातच गडफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली ( केशव गजानन आखाडे वय 27 वर्षे) असे मृतक अभियंत्यांचे नाव आहे.

गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयांच्या मागच्या भागात बांधकाम विभागाअंतर्गत विद्युत विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयात केशव आखाडे हा सहाय्यक वीज अभियंता म्हणून कार्यरत होता. आज दुपारी कार्यालयात कुणीच नसताना त्यांनी छताला गडफास लावून आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

केशव हा अविवाहित होता. वाशिम जिल्ह्यातील सिल्लोड येथील मूळ रहिवासी असलेला केशव चार-पाच महिन्यापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून गडचिरोली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागात सहाय्यक अभियंता पदावर रुजू झाला होता. अशी माहिती आहे. मात्र त्यांनी आज आत्महत्या केली.

घटनेनंतर पोलिसांनी मर्ग दाखल करून मृत्यू देहाचा पंचनामा केला. पोलीस निरीक्षक अरविंद कुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. केशव आखाडे यांनी कामाच्या तणावामुळे आत्महत्या केली की त्यामागे अन्य दुसरे कारण आहे. याविषयीचा उलगडा पोलीस तपासातच होईल, मात्र एका तरुण अभियंतेची आत्महत्या केल्याने हळूहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !