अबब...४ दिवसात सावली तालुक्यातिल १ विनयभंग तर २ अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण या प्रकरणात तिन आरोपी जेरबंद

0

वैनगंगा वार्ता

पोक्सो सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल.

उपसंपादक प्रविण तिवाडे वैनगंगा वार्ता

वैनगंगा वार्ता सावली -: सावली तालुक्यातील वेगवेगळ्या गावात मागील चार दिवसात विनयभंग आणि बलात्कारांच्या तीन घटना घडल्याने सावली तालुक्यात एकच खडबड उडाली आहे.

तालुक्यातील हिरापूर येथील 50 वर्षीय (धनराज पत्र गोहुणे) या नराधमाने एका ६ वर्षाच्या अल्पवयीन मुलींच्या अंग वस्त्रात हात घालून विनयभंग केल्याची तक्रार पीडितेच्या पालकांनी केल्याने त्याच्यावर भांदवी 354 व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली.

दुसऱ्या घटनेत सावली तालुक्यातीलच व्याहाड खुर्द येथील (अतुल रामनाथ मानकर) वय 19 वर्ष या आरोपीने दुसऱ्या गावातील १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून गर्भवती केले, मात्र लग्नास नकार दिल्याने पालकांच्या तक्रारीवरून भांदवी 376 अन्वये तथा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

तिसऱ्या घटनेत तालुक्यातील सोलापूर येथील (किशोर ऋषी मेश्राम) वय 25 वर्ष या युवकांने एका अल्पवयीन मुलीला लग्नाची आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केला, त्यात ती गर्भवती झाली, मात्र लग्नास नकार दिल्याने पालकांच्या तक्रारीवरून भांदवी ३७६ व पोक्सो अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करून पोलीस कोठडी ठेवण्यात आले.


सदर घटनेचा पुढील तपास सावली पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे व नायक पोलीस शिपाई विनोद वाघमारे करीत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !