रोडवर खड्डे की खड्ड्यात रोड
आष्टी येथील रोडची झाली चाळण
धुळीमुळे दुचाकीस्वार व जनता त्रस्त
हायवे कंत्राटदार यांचे दुर्लक्ष
डोळ्यांचे व स्वसनाचे आजार होऊ शकतात
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
आष्टी येथील रोडची चाळण झाली असून रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
रस्ता खराब व खड्डेमय असल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे व ही धुळ सुरजागड येथून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकांमुळे होते आहे
या धुळीमुळे दुचाकीस्वार यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे तसेच आष्टीत परीसरातील जनतेला धुळीमुळे डोळ्यांचे व स्वसनाचे आजार होऊ शकतात त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे
सकाळी व सायंकाळी दररोज रोडवर पाणी टाकल्या जात आहे परंतू दिवसभर धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
खड्डेमय रस्त्याने प्रवास करने कठीण झाले आहे हे खडृडे शासकीय बांधकाम विभाग की हायवे कंत्राटदार बुजविणार आणि जनतेला योग्य रोड करून देणार असा प्रश्नही उपस्थित होते आहे
तेव्हा शासनाने याबाबत लवकरच कार्यवाही करावी अशी मागणी आष्टी व परीसरातील केली आहे
