मोठी बातमी वाघाने घेतला वृध्द इसमाच्या नरडीचा घोट गायीसह केले ठार

0



्जोगना उपक्षेत्रातील मुरमुरी जंगल परिसरातील घटना.

उपसंपादक प्रविण तिवाडे वैनगंगा वार्ता 

कुनघाडा रै :- जिल्ह्यात वाघाने ठार केल्याच्या अनेक घटना घडत असून, कुनघाडा रै वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र जोगना अंतर्गत येणाऱ्या मुरमुरी जंगल परिसरातील कक्ष क्रमांक ४ मध्ये वाघाने हल्ला करून वृद्ध इसमाच्या नरडीचा घोट घेतला आहे. तर गायीसह ठार केले आहे.. दशरथ उंदरु कुनघाडकर वय ६० वर्ष रा. भाडभिडी मोकासा असे मृत वृद्धाचे नाव असून संदीप डोमाजी गव्हारे रा. भाडभिडी मोकासा यांच्या मालकीची मृत गाय आहे. दोन्ही घटना ८ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडल्या
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार मृत वृद्ध इसम दशरथ उंदरु कुनघाडकर हे नेहमीप्रमाणे ८ नोव्हेंबर रोजी ११ वाजता जेवण आटपून घरची स्वमालकीची गुरे चरावयास नेण्यासाठी जंगलात गेले होते. दबा धरून बसलेल्या वाघाने प्रथम दशरथ कुनघाडकर यांच्यावर हल्ला करून ठार केले. नंतर गायीवर वार करून तिला ठार केले. सायंकाळी ५ वाजता फक्त गुरे घरी परत आले. मात्र रात्र होऊन सुद्धा दशरथ कुनघाडकर हे घरी परत आले नसल्यामुळे गावातील ग्रा. प. सदस्य विकेश नैताम, भाऊराव नैताम, सुधाकर कुनघाडकर, शामराव कुनघाडकर व इतरांनी मिळून रात्री ११ वाजता जंगलात जाऊन शोध घेतला मात्र शोध लागला नाही.
९ नोव्हेंबर रोजी सकाळी शोधाशोध केली असता प्रथम मृत गायीचे प्रेत आढळले व नंतर त्यांच्या शेतशिवारात दशरथ कुनघाडकर यांचे अर्धवट
शरीर असलेले अस्थावयस्थ प्रेत आढळले प्रेताचा चेहरा व कपडे
यावरून ओळख पटली दशरथ कुनघाडकर यांच्या शरीराचे दोन तुकडे करून धड व पाय वेगळे झाले होते.
घटनेची माहिती मिळताच वनपिरिक्षेत्राधिकरी राहुल तांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली जोगना उपक्षेत्राचे क्षेत्र सहायक धाईत कुनघाडा रै उपक्षेत्राचे क्षेत्र सहाय्य एस. एम. मडावी वनरक्षक एन. बी. गोटा, व इतर वनकर्मचारी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. चामोर्शी पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळेयांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजकुमार चिंचेकर, गणेश बैस, जाधव महिला पोलीस चालक घटना स्थळी पोहचून पंचनामा केला. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवून नातेवाईकांच्या स्वाधीन केले. पुढील तपास वनविभागाचे कर्मचारी व पोलीस करीत आहेत कुनघाडा रै वनपरिक्षेत्रात वाघाने आजपर्यंत माणसास जखमी केले होते आणि वन्य व पाळीव प्राण्यावर हल्ला करून ठार केल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या मात्र माणसास ठार केल्याची ही पहिलीच

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !