ग्रामपंचायत लगाम येथे संविधान दिवस साजरा

0
ग्रामपंचायत  लगाम येथे संविधान दिवस साजरा


क्रिष्णा गावडे तालुका प्रतिनिधी

अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत लगाम येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला
   प्रथम विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस लगाम ग्रामपंचायतचे सरपंच दीपक मडावी यांनी पुष्प हार  अर्पण करून दीप  प्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरुवात केली  या प्रसंगी  उपसरपंच मधुकर गेडाम सदस्य राजभाऊ पंबलवार सदस्य उमा आत्राम सदस्य शैला मडावी सदस्य सुरेखा सोयाम पेसा मोबिलाजर सुरेखा मडावी तंटामुक्ती अध्यक्ष श्रीकृष्ण गावडे पेसा अध्यक्ष मधुकर मडावी ग्राम सेवक  राकेश दुर्गे   नंदेश मडावी सुरज मडावी जि. प शाळेच्या मुख्याध्यापक डी एम बारसागडे देवराव शेडमाके पुरुषोत्तम सोयाम अंगणवाडी सेविका बेबीताई त्रिनगरीवार चंद्रकला मडावी सर्व ग्रामपंचायत कर्मचारी विद्यार्थी ,विद्यार्थिनी उपस्थित राहून भारतीय संविधानाचे प्रास्ताविकेचे  वाचन करण्यात आले
यावेळी सरपंच दिपक मडावी यांनी  संविधान अबाधित ठेवण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी संघटीत राहीले पाहिजे तेव्हाच हे संविधान अबाधित राहील संविधानाने प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना त्यांचे अधिकार बहाल केले आहेत त्यामुळे संविधानाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे असे आवाहन केले

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !