श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात भारतीय संविधान जनजागृती रॅली चे आयोजन
उपसंपादक प्रविण तिवाडे वैनगंगा वार्ता
वैनगंगा वार्ता आष्टी
आष्टी श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आष्टी येथे दिनांक 26 /11/ 2022 रोजी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत भारतीय संविधान जन जागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे व वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ रमेश सोनटक्के आणि सह कार्यक्रम प्रा सुबोध साखरे यांनी या रॅलीचे आयोजन केले होते रॅली महाविद्यालय ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक आष्टी येथे जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला डॉ रमेश सोनटक्के यांनी पुष्पहार अर्पण करून संविधान जनजागृती पर घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली त्यानंतर महाविद्यालयामध्ये संविधान दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ रमेश सोनटक्के प्रमुख अतिथी डॉ अपर्णा मार्गोनवार प्रा जया रोकडे प्रा सुबोध साखरे मंचावर उपस्थित होते डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रा स्वप्निल धुरके डॉ अपर्णा मार्गोनवार प्रा जया रोकडे प्रा सुबोध साखरे या सर्वांनी भारतीय संविधानाचे मूलभूत अधिकार व कर्तव्य याचे पालन आपण सर्वांनी केले तर आपण भारतीय संविधान चे संरक्षण करू शकतो असे विचार व्यक्त केले अध्यक्षीय भाषणातून डॉ सोनटक्के यांनी संविधान हा सर्वांचा धार्मिक ग्रंथ असला पाहिजे आणि तो सर्वांनी आपल्या घरी विकत घेऊन त्याचे वाचन करून इतरांना संविधान विषयी जनजागृती करावी असे मार्गदर्शन केले प्रा सुबोध साखरे यांच्यातर्फे महाविद्यालय ग्रंथालयाला संविधान पुस्तिका व संविधानाची प्रस्ताविकेचा फोटो व इतर मान्यवरांना संविधान पुस्तके भेट देण्यात आली सदर कार्यक्रमाचे संचालन प्रा कवींद्र साखरे तर आभार प्रदर्शन प्रा महेश सिलमवार यांनी केले याच कार्यक्रमांमध्ये 26 11 ला बॉम्बे मध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सर्व शहिदांना विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ पी के सिंग, डॉ एम पी सिंग, डॉ प्रदीप कश्यप, डॉ सोनाली धवस, डॉ दीपक नागापुरे, ,श्री विजय खोब्रागडे, श्री अविनाश जीवतोडे ,श्री संदीप मानापुरे, रवींद्र झाडे कुमारी शुभांगी डोंगरे, ,श्रीमती उषा माहूर पवार, आणि वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले

