आश्वासनाची पूर्तता न करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध

0
आश्वासनाची पूर्तता न  करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध 

शेतकऱ्यांना दिलेले आस्वासन ठरले फोल

डॉ.महेश कोपुलवर 


अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता

  आरमोरी वृत
 केंद्र सरकारने शेतकरी विरोधात केलेल्या तीन काळया कायद्या विरुध्द च्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची सांगता करताना शेतकऱ्यांनी दिलेले आश्वासन केंद्र/ मोदी सरकारनी न पाळल्यामुळे आज संविधान दिनाच्या दिवशी संपूर्ण देशभर विविध शेतकऱ्यांच्या विविध कृतिसमितीच्या वतीने केंद्र सरकारचा / मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
      देशभरातील शेतकऱ्यांच्या संघटनांना विश्वासात न घेता किंवा शेतकरण्याच्या संघटनांशी चर्चा न करता भांडवलदर कॉर्पोरेट यांच्या हितासाठी सर्वप्रथम अध्यादेश द्वारे व  तदनंतर संसदेत तीन काळे कायदे पारित केले. सदरचे तिन्ही काळे कायदे हे संपूर्ण अभ्यासाअंती व अनुभवांती सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या विरोधात व केवळ आणि केवळ भांडवलदार आणि कॉर्पोरेट याच्या हितांचे दिसून आल्या मुळे देशातील ५०० पेक्षा जास्त शेतकरी संघटना एकत्रित येऊन या काळया कायद्यानं विरुध्द व इतर मागण्यांसाठी दि.२६ नोव्हेंबर २०२० म्हणजेच संविधान दिनाच्या दिवशी पासून दिल्लीमध्ये आंदोलन करण्याचे ठरवून आंदोलन सुरू केले. परंतु केंद्र सरकारने सदर आंदोलकांना दिल्लीमध्ये घुसू दिले नाही. व त्यामुळे शेतकरी आंदोलकांना दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू करावे लागले. सदरचे आंदोलन हे तेरा महिन्यापेक्षा जास्त दिवस चालले. दरम्यान ७०० हून अधिक शेतकरी मरण पावले. सरकारला जेव्हा कळून चुकले की, शेतकरी कोणत्याही प्रकारे आंदोलन मागे घ्यायला तयार नाहीत व आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, तेव्हा सरकारने शेतकरी विरोधी तिन्ही काळे कायदे मागे घेऊन शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव देण्याचे आश्वासन दिले, तसेच आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना नुकसाभरपाई देण्याचे, आंदोलनादरम्यान लावण्यात आलेले फौजदारी खटले मागे घेण्याचे आश्वासन दिलेले होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी व कृषिमत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही व शेतकऱ्यांच्या विश्वासघात केला. म्हणून आज संपूर्ण भारतात केंद्र/ मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. ह्या आंदोलनामध्ये अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कॉ. डॉ. महेश कोपुलवार, कॉ. देवराव चवळे, कॉ. ऍड. जगदीश मेश्राम, कॉ. संजय वाकडे, कॉ. मीनाक्षी सेलोकर, कॉ. सिंधू कापकर, कॉ. सुरेश सोनटक्के, कॉ. प्रकाश खोब्रागडे, कॉ. चंद्रभान मेश्राम, कॉ. प्रशांत खोब्रागडे, कॉ. केवळ राम नागोसे, ऍड.भूषण राहाटे,मिलिंद खोब्रागडे ( ता.अध्यक्ष काँग्रेस),  शालिकराम पत्रे ( शहर अध्यक्ष), निलेश अंबादे, रुपेश जौजांलकर, विजय थाटे, अयुब शेख ( ता. अध्यक्ष परिवहन विभाग), भीमराव बरसागडे, सूरज भोयर , डेविड ढोरे , निखिल दुमाने, खेमराज चाटाले , सौरभ मस्के , अनिल किरम , अमीन शेख, राजेश सामृतवर ,चुणीलाल मोटघरे ,वेणूताई ढवगाये,श्रीनिवास आंबटवर यांच्या सह बहुसंख्य लोक उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !