फुले महाविद्यालयात संविधान दिन साजरा
राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभागाचे आयोजन
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
आष्टी - वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी, जिल्हा गडचिरोली येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांच्या अध्यक्षतेखाती संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विश्वरत्न संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून दीप प्रज्वलनाने प्रारभ झालेल्या कार्यक्रमाला सेवा जेष्ठ प्राध्यापक राजकुमार ठवरे, डॉ राजकुमार मुसने, डॉ. गणेश खुणे, डॉ. रवी शास्त्रकार, डॉ. भारत पांडे, प्रा ज्योती बोबाटे ,प्रा रवी गजभिये, प्रा शाम कोरडे आदी उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महा.चे व्याख्याते राजकुमार ठवरे यांनी संविधानाची आवश्यकता, संविधानाचे महत्त्व व काळाच्या कसोटीवर संविधान किती उपयुक्त आहे त्याचे विषयीचे सविस्तर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन सामूहिकरित्या करण्यात आले .कार्यक्रमाचे संचालन निकिता चौधरी हिने तर प्रास्ताविक पायल पुल्लीवार हिने तर उपस्थित्यांचे आभार काजल करपते हिने मानले.

