खासदारकीचा राजीनामा द्यावा साठी आंदोलन
विदर्भ वादी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
गडचिरोली जिल्ह्यातील खासदार अशोक नेते यांनी राजीनामा द्यावा यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येणार आहे
पाच नोव्हेंबर 2022 ला पुराडा ग्रामपंचायत च्या सभागृहात विदर्भ राज्य आंदोलन समिती तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली ची बैठक विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत 11 नोव्हेंबर 2022 ला खासदार अशोक नेते यांच्या गडचिरोली येथील कार्यालयात जाऊन त्यांना राजीनामा मागण्या करता राजीनामा द्या आंदोलन करण्यात येणार आहे याची रूपरेषा या बैठकीत ठरवण्यात आली.
या आंदोलनाला कुरखेडा तालुक्यातून शेकडो विदर्भवादी सहभागी होणार आहेत विदर्भातील अकरावे खासदार स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी संसदेत कसलाही प्रयत्न केला नाही सत्ताधारी पक्षांचे खासदार मोदी समोर चिडीचूप राहतात त्यामुळे विदर्भातील जनतेच्या आशा आकांक्षाची पूर्तता करण्यास अपयशी ठरले आहेत, तसेच विरोधी पक्षाचे खासदारही या मुद्द्यावर संसदेत काहीही बोलत नाही म्हणून तुमचा काम संसदेत काही नाही म्हणून राजीनामा द्या हा आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समितीने जाहीर केलेला आहे या आंदोलनात विदर्भातील तमाम जनता जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं असा आव्हान विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा गडचिरोलीच्या वतीने करण्यात येत आहे या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष
घीसुजी पा.खुणे, जिल्हा यू,आ,अ ग्यानचंद साहारे पूर्व गडचिरोली जिल्हा , तालुकाध्यक्ष तालुका कुरखेडा रामचंद्र रोकडे ,शहर प्रमुख मुक्ताजी दुर्गे कुरखेडा , रामचंद्रजी कोडाप , सेवाराम ठेला , शोबितराम सोनजाल , मदनसिंग ब्रह्मनायक , ठाकूर राम कोसरे , बुधराम सोहळा आदी कार्यकर्ते उपस्थित होते

