No title

0
 खड्डेमय रस्ता तरीही नूतनीकरण होईना


 रस्ता दुरुस्ती करा. मनसेची मागणी


 अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता

 आरमोरी : तालुक्यातील जोगीसाखरा ते पळसगाव मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना खड्डे चुकवताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या मार्गाचे नूतनीकरण करावे, अशी मागणी मनसेचे पळसगाव शाखा प्रमुख सारंग सपाटे व नागरिकांनी केली आहे.

 जोगीसाखरा -पळसगाव मार्ग अनेक गावांना जोडतो.  आदी गावांतील ग्रामस्थ या मार्गाने आरमोरी तालुका मुख्यालयात व आरमोरी बाजारात ये-जा करतात.

खासगी वाहनांसह  व अन्य वाहनांची वर्दळ दररोज असते. या मार्गावर जागोजागी खड्डे पडून अत्यंत दुरवस्था झाली आहे. खड्यांमुळे अपघाताची शक्यता असल्याने या मार्गाची केवळ डागडुजी न करता नूतनीकरण करावे, अशी मागणी पळसगाव परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. विशेष म्हणजे, सदर मार्गाची दुरूस्ती करण्याची वारंवार मागणी करण्यात आली. परंतु दुर्लक्ष झाले.रस्ता दुरुस्त करा पळसगाव मनसे शाखा प्रमुख सारंग सपाटे यांनी केली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !