पूरबाधित शेतकरी मदतीपासून वंचित

0



पूरबाधित शेतकरी मदतीपासून वंचित

चामोर्शी प्रतिनिधि तेजल झाडे 
वैनगंगा वार्ता

चामोर्शी जुलै व ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे तालुक्यातील कळमगाव येथील शेतकऱ्यांचे रोवणी केलेले पीक हातून गेले. येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा अधिक फटका बसूनही पाहिजे त्या प्रमाणात मदत न देता मलमपट्टी करणारी मदत मिळाली. काही शेतकऱ्यांना एक छदामसुद्धा मिळाली नाही. शासनाच्या निकषाप्रमाणे आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

जुलै व ऑगस्टमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे कळमगाव येथील शेतजमिनी पाण्याखाली येऊन रोवणी केलेले धानपिक भूईसपाट झाले. नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आलेले तालुका कृषी सहायक यांनी थातुरमातुर पंचनामा करून निघून गेले. त्यामुळे योग्य माहिती संबंधित विभागाला पोहचली नाही. याउलट ज्या गावातील होते.

शेतकऱ्यांची पिके अतिवृष्टीमुळे गेली नाही, अशा गावातील शेतकऱ्यांना 13 हजार आर्थिक मदत मिळाली. मात्र पूरबाधित कळमगावातील शेतकऱ्यांना केवळ 6 हजार रुपये मदत मिळाली. काही शेतकऱ्यांना अजूनही आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. ज्या गावातील शेतकऱ्यांना 13 हजार रुपये मदत मिळाली, तिच मदत कळमगाव येथील शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदन देताना शेतकरी दादाजी तुंबडे, मोरेश्वर जेंगठे, महादेव चौधरी, गणपती सातारे, छबिलदास तुंबडे, अविनाश तुंबडे, यशवंत मॅकलवार, धनंजय धोटे, नितीन थोरेवार, विश्वनाथ चुदरी, पंकज लाड, अरविंद तुंबडे, सुरेश चुदरी, होमदेव तुंबडे, र चिरकुटा जेंगठे, परमात्मा गेडाम, वासुदेव चाटारे, दादाजी कुथे उपस्थित प

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !