टी-60 साठी दोन पथके सज्ज
नरभक्षी वाघिनीच्या हल्ल्यामुळे दहशत
विशेष पथकाच्या पदरी निराशा
संपादक अशोक खंडारे वैनगंगा वार्ता
गडचिरोली ब्यूरो. गडचिरोली वनविभागात मागील काही महिन्यांपासून टी-6 नामक नरभक्षी वाघिणीने प्रचंड दहशत माजविली आहे. सदर वाघिणीचा गडचिरोली वनपरिक्षेत्रासह वडसा वनविभागातील पोर्ला वनपरिक्षेत्रात संचार सुरू असल्याने या जंगल परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीत वावरत आहेत. या वाघिणीद्वारे जनावरांचा फडशा पाडत असतानाचा मानवावरील हल्ले वाढल्याने या क्षेत्रात मानव-व्याघ्र संघर्ष शिगेला पोहचला आहे. या नरभक्षी वाघिणीला जेरबंद करण्यासाठी ताडोबा व अमरावती येथील विशेष पथकाला पाचारण करण्यात आले असून मागील काही दिवसांपासून वाघिणीला जेरबंद करण्यासाठी दोन्ही पथक जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. मात्र अद्यापपर्यंत टी-6 वाघिण त्यांच्या हाताला गवसली नसल्याने सद्यस्थितीत दोन्ही पथकाच्या पदरी निराशाच पडली आहे. टी-6 वाघिणीने गडचिरोली तालुक्यातील
अनेक गावात आपली दहशत माजविली आहे. यासोबतच वडसा वनविभागांतर्गत येत असलेल्या पोल वनपरिक्षेत्रातील जंगलातही या वाघिणीचा संचार कायम असल्याने या दोन्ही वनपरिक्षेत्रातील गाव परिसरात वाघिणीची प्रचंड दहशत आहे. यामुळे शेतकरी शेतात जाण्यासही धजावत नसल्याचे वास्तव आहे. सातत्याने वाघिणीद्वारे हल्ले वाढल्याने नागरिकांचा आक्रोश लक्षात घेता शासनाने टी-1 वाघाप्रमाणे टी-6 वाघिणीलाही जेरबंद करण्याचे आदेश काढले आहेत. याअंतर्गत वनविभाग अलर्ट मोडवर आले आहे. सदर वाघिणीला जेरबंद करण्यासाठी चंद्रपूर येथील ताडोबाचे शार्पशूटर पथक तसेच अमरावती येथील विशेष रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले आहे. सदर दोन्ही पथकाला सदर नरभक्षी वाघिणीला जेरबंद करण्याची बाबदारी सोपविण्यात आली.
टी-6 वाघिणीद्वारे तापर्यंत 6 जणांची शिकार
मागील काही महन्यांपासून टी-6 या नरभक्षी वाघिणीने गडचिरोली वनविभागांतर्गत येत असलेल्या गडचिरोली व पोर्ला वनपरिक्षेत्रात दहशत माजवली आहे. आतापर्यंत सदर नरभक्षी वाघिणीने या क्षेत्रात जवळपास 6 नागरिकांचा बळी घेतला आहे. मागील महिन्यात वडसा वनविभागात दहशत माजविणाऱ्या टी- वाघाला जेरबंद करण्यात वडसा वनविभागाला यश आले होते. मात्र टी-6 ही वाघिण वनविभागात सातत्याने हुलकावणी देत आहे. परिणामी सदर जंगल परिसरात अद्यापही सदर वाघिणीची दहशत कायम आहे. त्यामुळे सदर नरभक्षी वाघिणीचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.
नागरिकांनी सतर्कता बाळगावी
नरभक्षी वाघिणीला पकडण्याचे आदेश जाहीर
करण्यात आले आहे. त्यानुसार दोन्ही पथकाला पाचारण करीत वाघिणीला पकडण्याकरिता शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत सबंधित वनविभागात वाघिणीचे प्रचंड दहशत माजविली आहे. त्यामुळे नागरीकांनीही विशेष सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. विशेषत: जंगल परिसरालगत असलेल्या गावातील नागरिकांना जंगलात जाणे टाळावे.
नरभक्षी बाघिनीची पथकाला हुलकावणी
नरभक्षी वाघिणीला पकडण्यासाठी वनविभागाने संवार असलेल्या जंगलात ट्रंप कमेरेद्वारे शोध मोहीम राबविली जात आहे. सोबतच पडकण्यासाठी पिंजरेही लावण्यात आले आहेत. मात्र सदर वाघिन वनविभागासह दोन्ही विशेष पथकाला हुलकावणी देत आली आहे. त्यामुळे नरभक्षी टी-6 वाघिणीला जाळ्यात ओढण्यासाठी शिकार ठेवण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. मागील महिन्यात वडसा वनविभागात दहशत माजविण्याऱ्या सीटी -1 वाघाला पकडण्यात वनविभागाला यश आले. या वाघाला जेरबंद करण्यासाठी शिकारीचे लालच दाखविण्यात आले होते. या नियोजनाअंतर्गत टी-6 वाघाला जेरबंद करण्यासाठी शिकार टाकण्याचा वनविभागाचा मानस आहे,,.

