ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ
उपसंपादक प्रविण तिवाडे वैनगंगा वार्ता
गडचिरोली : जिल्यातील ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, पटसंख्या वाढावी यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आले. पण गडचिरोली जिल्ह्यात मात्र याच योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होतोय. ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनेक विध्यार्थी शिक्षण घेत आहेत. अश्या ग्रामीण भागातल्या काही शाळांमध्ये पोषण आहारासाठी बुरशी आलेली तूरडाळ, कुजलेला वाटाणा आणि मिसळलेला अळ्या लागलेले तांदूळ असे धान्य पुरवण्यात आले आहे... ग्रामीण भागातील शाळेत विद्यार्थी पट संख्या वाढावी आणि विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी लागावी, प्रकृती सुधारणा व्हावी यासाठी राज्य शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी शाळेतली खिचडी न खाता घरच जेवण पसंत करतात. वितरण करण्यात आलेले पोषण आहार निकृष्ट दर्जा असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. तुरडाळ भिजलेली असल्याने तुरडाळ वर बुरशी आली आहे. वाटाणा कुजलेला तर माती मिसळलेले तांदूळ आहे. या तांदळाला आळ्या लागल्या आहे, धान्य माणसाचं काय तर प्राण्यांच्या ही खाण्याच्या दर्जाचे नाही. अशा परीस्थिती रोग प्रतिकारक क्षमता कमी असलेल्या लहान विद्यार्थ्यांना सडलेले धान्य पोषण आहाराच्या नावाने खायला देणे म्हणजे या चिमुकल्यावर एका प्रकारे अत्याचार करणं आहे. असे मत माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मांडले असून लगेच संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिले आहे

