आष्टी :-
गडचिरोली जिल्हा अमॅच्युअर कराटे बहुउददेशिय संस्था, आष्टी आणि श्री. छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था, आष्टी यांच्या संयुक्त विदयमाने आयोजीत द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा दिनांक २७ नोव्हेंबर २०२२ रोज रविवारला माहात्मा ज्योतीबा फुले हाय स्कूल तथा कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय आष्टी येथे कराटे प्रशिक्षक कपिल मसराम आणि श्री. छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी चे अध्यक्ष पवन रामगिरकर व सर्व पदाधिकारी, सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आला होता.
या द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धेला विदर्भातील सर्व जिल्हयातील जवळपास ३२० कराटे खेळाडूंनी सहभाग घेतला असून सदर स्पर्धेचे उदघाटन आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आला तर अध्यक्ष स्थानी बबलू भैय्या हकीम (उपाध्यक्ष वनवैभव शिक्षण प्रसारक मंडळ अहेरी) विशेष अतिथी महापत्रा साहेब, उद्धवराव खोब्रागडे साहेब, बाबूराव कोहळे, कुंदन गावडे साहेब (पोलीस निरीक्षक, आष्टी) प्रमुख अतिथी सौ. बेबीताई बुरांडे सरपंच आष्टी, सौ. मंदाताई कुळसंगे सरपंच ठाकरी, सौ. वनश्रीताई चापले सरपंच मार्कडा कं, सौ. रूपालीताई पंदिलवार, सौ. पुष्पाताई व्यंकटी बुर्ले, प्राचार्य शैलेंद्र खराती, रविभाऊ येबंडवार, व्यंकटी बुर्ले, संजयभाऊ पंदिलवार, राकेशभाऊ बेलसरे, सुशिल अवसरमोल, प्रा. श्याम कोरडे, प्रा. डॉ. भारत पांडे, शंकर पाटील मारशेटटीवार, योगनृत्य परीवारचे प्रमुख सौ. सपनाताई पांडे, दिपक पांडे आणि टायगर गृप आलापल्ली चे अध्यक्ष दौलत रामटेके, उपाध्यक्ष साईभाऊ तूलसीगीरी, अहेरीचे आदित्यभाऊ जक्कोजवार, सूचितभाऊ कोडलवार यांच्या प्रमूख उपस्थितीत पार पडले. संचालन विकास आचेवार तर आभार प्रदर्शन अनिकेत हजारे यांने केले.
या द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी संदिपभाऊ तिवाडे, संदिपभाऊ लोढलीवार, देवाभाऊ बोरकूटे, रितीक पांढरमिसे, अक्षय हनमलवार, अक्षय वाभीटकर, सूरज बावणे, लाला चवरे, उत्तम पोरटे, सूनिल इजगिरवार, विलास मूत्तेवार, अनिकेत हजारे, प्रशांत डोगरे, राज दुर्गे, मोहित दुर्गे, यश बामणकर, कु. आचल अलोणे, कु. अक्षता लांबाडे या सगळ्यांनी परीश्रम व मेहनत घेतले. आष्टी शहरात पहिल्यादांच एवढी मोठी कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याने स्पर्धेच्या ठिकाणी स्पर्धा बघण्यासाठी आष्टीतील तसेच परीसरातील नागरीकांनी खुप मोठी गर्दी केली

