संस्कार पब्लिक स्कूल येथे संविधान दिन साजरा. एटापल्ली

0
संस्कार पब्लिक स्कूल येथे संविधान दिन साजरा.
एटापल्ली 

प्रविण तिवाडे उपसंपादक वैनगंगा वार्ता 

एटापल्ली   येथील संस्कार संस्था द्वारा संचालित संस्कार पब्लिक इंग्लिश मिडीयम स्कूल विद्यमाने शनिवार २६ नोव्हेंबर  ला संविधान दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
         कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थापक  विजय संस्कार यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यारपण केले .यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक अमोल गजाडीवार, पूजा दासरवार, तबसुम शेख, बबिता ढाली, राजश्री बारसागडे, आदी प्रामुख्याने उपस्थित होते .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ,प्रमुख अतिथी तसेच शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थांसमक्ष  संविधानाच्या प्रास्ताविकेेचे वाचन करण्यात आले.
    यावेळी सुदर्शन मारगोनवार यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व व संविधानाच्या आदराविषयी सविस्तर मार्गदर्शन करताना म्हटले की,संविधान हे भारतीयांचा आत्मा आहे. मुख्याध्यापक अमोल गजाडीवार यांनी संविधानाविषयी  सविस्तर माहिती  दिली.कार्यक्रमात संविधान दिनानिमित्त विद्यालयात आयोजित संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे वाचन, .तसेच या दिनाचे औचित्य साधून चित्रकला  स्पर्धा घेण्यात आली. 
             कार्यक्रमाला विद्यालयातील  शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका हिना शेख यांनी केले तर आभार पूजा दासारवार यांनी मानले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !