येणापूर येथील आरोग्य पथक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या महिलांची गैरसोय उपकेंद्रात अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची गैरसोई दोशींवर कारवाई करण्याची सरपंच नीलकंठ निखाडे यांची मागणी

0
येणापूर येथील आरोग्य पथक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या महिलांची गैरसोय

उपकेंद्रात अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची गैरसोई

दोशींवर कारवाई करण्याची सरपंच नीलकंठ निखाडे यांची मागणी


उपसंपादक तेजल झाडे वैनगंगा वार्ता

चामोर्शी तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या येनापूर येथील प्राथमिक आरोग्य पथकामध्ये कुटुंब नीयोजन शस्त्रक्रिया केलेल्या महिलांची अत्यंत गैरसोय होत असून शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना बेडअभावी खाली झोपावे लागत आहे. तसेच पथकामध्ये अस्वच्छता असून पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा गैरसोय होत आहे. या संपूर्ण प्रकारास येथील आरोग्य अधिकारी जबाबदार असून रुग्णाच्या जीवाशी खेळ केला जात असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सरपंच नीलकंठ  निखाडे यांनी केली आहे
       प्राथमिक आरोग्य पथक येनापूर येथे परिसरातील अनेक गावांमधील नागरिक उपचार घेण्यासाठी येतात. परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने या पथकामध्ये नागरिकांना उपचारा विनाच परतावे लागते वास्तविक पाहताच आरोग्य केंद्र आठ वाजता खुल व्हायला पाहिजे परंतु येतील कर्मचारी हे नऊ वाजताच्या पहिले येऊ शकत नाही आणि दवाखाना उघडण्यास विलंब होतो हे सुद्धा आरोग्यास धोकादायक आहे एखादा व्यक्ती गंभीर असेल तर तो तात्काळ उपचार होण्यासाठी कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी वाट पहात बसतो मात्र कोणताही कर्मचारी या ठिकाणी वेळेवर उपलब्ध होत नाही त्यामुळे रुग्णाला खासगी रुग्णालयात उपचार करावा लागतो हे प्रकार चुकीचे व शासनास धोका देण्याचे आहेत म्हणून ह्या आरोग्य केंद्रात नियमितता असावी अशीही मागणी सरपंच निलकंठ निखाडे यांनी केली आहे.

सदर आरोग्य केंद्रात अनिमित्त असल्याने व खालील साम्राज्य पसरले असल्याने बऱ्याच रुग्णांना या ठिकाणी त्रास संभवंतो आहे त्यामुळे या ठिकाणी व्यवस्थित नियोजन व्हावे अशी मागणी सरपंच नीलकंठ निखाडे यांनी केली आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !