ग्रामीण भागात पेट्रोलची अवैध विक्री

0


ग्रामीण भागात पेट्रोलची अवैध विक्री 

दुचाकी वाहन चालकांची आर्थिक लूट

 उपसंपादक तेजल झाडे 9325801303


गड़चीरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री केल्या जातात आहे.
खेड्यातील काही किराणा दुकानदार या अवैध गुंतले आहेत. शहरातील पेट्रोलपंपावरून ठोक स्वरूपात पेट्रोल आणून ग्रामीण भागात अवाजवी दर लावून वाचालकांना पेट्रोल विकल्या जात आहे. याकडे मात्र संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण भागातील दुचाकी चालकांची मात्र आर्थिक लूट होत आहे.
       जिल्ह्यातील आदिवासी बहुल अति संवेदनशील भागात पेट्रोलपंपाची वानवा आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना तालुका स्थळीच पेट्रोल भरावयात जावे लागते. मात्र यासाठी बरीच किमीची पायपीट करावी लागत असल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. या संधीचा फायदा घेत ग्रामीण भागातील काही दुकानदार पेट्रोल अवैध साठा करून दाम दुपटीत पेट्रोल विक्री करीत आहेत. नाईलाजस्ताव नागरिकही याला विरोध करीत नसल्याने त्यांचे चांगलेच फावले आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक दुर्गम व ग्रामीण भागात अवैध पेट्रोल विक्रीचा जोम चढला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !