महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयात मानव विषय मिशन अंतर्गत सायकल वितरण
प्रविण तिवाडे उपसंपादक वैनगंगा वार्ता
आरमोरी प्रतिनिधि
दि. 24/11/2022
मानव विकास मिशन अंतर्गत महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय आरमोरी येथे 44 गरीब व गरजू शालेय विद्यार्थिनीना मोफत सायकलचे वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्मानीय सचिव मा. मनोजभाऊ वनमाळी, मा. अरविंदजी टेंभुर्णे साहेब, (जिल्हा नियोजन अधिकारी, मानव विकास गडचिरोली ) गटशिक्षणाधिकारी मा. कोकुडे साहेब पंचायत समिती आरमोरी, संस्था सचिव मा. दीपकभाऊ बेहरे साहेब, संस्था सदस्य मा. उमाकांतजी वनमाळी साहेब, मा. नामदेवजी सोरते साहेब, मा. मयूरजी वनमाळी साहेब, तसेच महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य. श्री - साईनाथजी अद्दलवार सर, उपप्राचार्य - श्री विलास आंबोरकर सर उपस्थित होते. यांच्या प्रमुख उपस्थिती सायकल चे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा. दीपक गोंडाणे यांनी तर मान्यवरांचे आभार प्राचार्य श्री साईनाथजी अद्दलवार सर यांनी मानले. कार्यक्रमाला उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व प्राध्यापक - प्राध्यापिका शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

