बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे तत्त्वनिष्ठ नेते होते
प्रा. शरद पाटील
खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
सांगली-:महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र व अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक दिवंगत बॅरि. राजाभाऊ तत्त्वनिष्ठ नेते होते अशा प्रतिक्रिया जनता दलाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष मा.आमदार शरद पाटील यांनी व्यक्त केल्या.रविवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते राजस खोबरागडे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना प्रा. पाटील यांची त्यांनी सदिच्छा भेट घेतली त्यावेळी प्रा. पाटील हे दिलखुलास गप्पा मारताना बोलत होते. यावेळी त्यांनी बॅरि. राजाभाऊ खोबरागडे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर रिपब्लिकन चळवळ गतिमान करण्याचे काम खऱ्या अर्थाने बॅरि. राजाभाऊ खोबरागडे यांनी केले असल्याचे सांगून आज त्यांचे नातू राजस खोबरागडे हे त्यांच्या विचारांचा वसा व वारसा घेऊन पुढे आल्याबद्दल त्यांनी राजस खोबरागडे यांचे कौतुक केले व राजस खोबरागडे यांच्या कार्याला त्यांनी कारायमस्वरूपी आपले समर्थन व पाठिंबा राहील अशी ग्वाही दिली. यावेळी त्यांच्या सोबत प्रदेश सचिव डी. के. साखरे, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अमित ढवारे ,सांगली जिल्हा महिला अध्यक्ष अनिता शिवशरण, सोलापूर जिल्हा सरचिटणीस श्रीमंत आठवले यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून व मोटार सायकल रॅली काढून सांगली शहरातून राजस खोबरागडे यांचे मिरवणुकीने स्वागत करण्यात आले.

