एड्स जनजागृती मार्गदर्शन व रॅली
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
आष्टी -
वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलगित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामीण रुग्णालय आष्टी राष्ट्रीय किशोरी स्वास्थ्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात जागतिक एडस दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय फुलझेले , मां. आशा सोनवणे, प्रा.डॉ.राजकुमार मुसने , प्रा.ज्योती बोबाटे,प्रा डॉ. भारत पांडे , प्रा डॉ. गणेश खुने सर , प्रा डॉ.रवी शास्त्रकार , प्रा. रवी गजभिये उपस्थित होते. जागतिक एड्स दिननिमित्त समुपदेशक ग्रामीण रुग्णालय आष्टी येथील मा.आशा सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
एचआयव्ही हा एक असा विषाणू आहे आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करतो आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या आजारांची लागण होते. त्या आजारांच्या समूहाला एड्स असे म्हटले जाते .एचआयव्हीची लागण दूषित रक्त, दूषित इंजेक्शन, गरोदर मातेकडून बाळाला आणि असुरक्षित लैंगिक संबंध यापासून होते. बचाव करायचे असल्यास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व्यक्तीने लग्नाच्या आधी ब्रह्मचर्य पाळणे, लग्नाच्या आधी स्वतःची व जोडीदाराची एचआयव्हीची तपासणी करून घेणे, तसेच लग्नानंतर एकनिष्ठ राहणे या प्रकारे आपण बचाव करू शकतो. जर आपल्याला एचआयव्ही संबंधी काही शंका असल्यास ग्रामीण रुग्णालयामध्ये एचआयव्ही बाबत सल्ला व समुपदेशन दिल्या जातात तसेच एच आय व्ही ची मोफत तपासणी केल्या जाते म्हणून ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन एचआयव्ही बाबत योग्य माहिती व तपासणी करून घेता येते. याबाबत सोनवणे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. महाविद्यालयात मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन नंतर आष्टी गावामध्ये रॅली काढण्यात आली. गावातील मुख्य चौक ,आंबेडकर चौक एड्स जनजागृती पर घोषणा देत रॅली काढण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील मुख्य चौकात आशा सोनवणे व राजकुमार मुसने यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉराजकुमार मुसने यांनी प्रास्ताविक पायल मडावी हिने तर आभार प्रा. ज्योती बोबाटे यांनी केले.

