बैलगाडी वर चढला ट्रक
पीता व पुत्र गंभीर
बैल सुद्धा जखमी
जमावाने ट्रक ला आगीच्या भक्ष्यस्थानी लोटले
अशोक खंडारे संपादक
वैनगंगा वार्ता
गडचिरोली जिल्ह्यातील वडसा तालुक्यातील कोंढाळा गावाजवळ बैलगाडी वर चढला ट्रक या अपघातात पीता व पुत्र गंभीर झाल्याची घटना आज दि.१ नोव्हेंबर ला सायंकाळी ७.३५ वाजता चे दरम्यान घडली.
गंभीर जखमी श्रीकृष्ण माणिक वाढई व त्याचे वडील दोघेही रा कोंढाळा हे शेतातील कामे आटोपून घराकडे जात असताना ट्रकने जोरदार धडक दिली व सरळ बैलगाडी वर चढला त्यामुळे बैल व पिता, पुत्र गंभीर जखमी झाले दोघेही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जमलेल्या जमावाने सदर ट्रकला आगीच्या भक्ष्यस्थानी लोटले

