आष्टी येथे संविधान दिनानिमित्त जाहीर व्याख्यान
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे संविधान दिनानिमित्त जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे
आष्टी येथील कर्मचारी प्रबोधन संघटना यांच्या वतीने २६ नोव्हेंबर ला सायंकाळी ४ ते ७ वा पर्यंत जाहीर व्याख्यानमाला आयोजित केली आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी सरपंच तथा रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते सुंदरदास उंदिरवाडे, सह उद्घाटक आदर्श शिक्षक मंडळाचे अध्यक्ष उद्धवराव खोब्रागडे, अध्यक्षस्थानी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत मार्गदर्शक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी गौतम मेश्राम, शिक्षण विस्तार अधिकारी धर्मानंद मेश्राम हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ११ ते १ वाजता पर्यंत संविधान सम्मान रॉली व आष्टी येथील चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करूने तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करणे असे आयोजित करण्यात आले आहे
सदर कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष प्रकाश डोर्लीकर, सचिव हरीदास मेश्राम यांनी केले आहे

