सहकारी संस्थांना आमदार गजबें ची तंबी
शेतकऱ्यांची पिळवणुक खपवुन घेणार नाही
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार गजभे यांनी धान्य खरेदी केंद्रातील लुट थांबविण्यासाठी सहकारी संस्था तंबी दिली आहे शासकिय धान खरेदी विक्री संस्थांकडुन शेतकऱ्यांचे धान खरेदी करतांना नियमबाह्य पद्धतिने गोदाम भाडे व हमालिच्या स्वरुपात ५० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे वसुली केली जात असल्याची तक्रार आमदार कृष्णा गजबे यांना प्राप्त होताच शेतकऱ्यासह खरेदी विक्री केंद्रावर जावुन आमदार क्रिष्णा गजबे यांनी शेतकऱ्यांची पिळवणुक केल्यास खबरदार असा इशारा दिला . सविस्तर वृत्त असे की देसाईगंज तालुक्यात पणन महामंडळाच्या वतिने शेतकऱ्यांचे धान खरेदी चे अधिकार काहि खाजगी संस्थांना देण्यात आले या संस्थांनी धान खरेदी करण्यासाठी ओलाव्या चा बहाणा करुण टाळाटाळी करणे सुरु केले
शेतकरी किरायाच्या ट्रैक्टरने धान विक्रिसाठी आणत असल्याने आपल्यावर अतिरिक्त भुर्दंड बसेल या भितीपोटी सहकारी संस्थांने जे नियम लावेल त्याला लाचारीपोटी मुक सम्मती दर्शवु लागला याचा गैरफायदा घेत ओलाव्या च्या वजनासह हमाली व गोदामभाडे प्रति क्विंटल ५० रुपये प्रमाणे लुट सहकारी संस्थांनी सुरु केली या प्रकरणाची चाहुल लागताच न प देसाईगंज चे माजी सभापती सचिन खरकाटे माजी नगराध्यक्ष श्याम उईके सचिन वानखेडे चौपणदास विधाते यांनी सहकारी संस्थांच्या गोदामात जाऊन चौकशी केली असता ही बाब खरी निघालो तेव्हा जिल्हा पनण अधिकाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा करुण उपोषणाला बसण्याची दमदाटी देत क्षेञाचे आमदार कृष्णाभाऊ गजबे यांना संपुर्ण प्रकार समजावुन सांगितला या सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांची पिळवनुक करण्याची दुसरी क्लूप्ती शोधुन काढत तब्बल दोन दिवस धान खरेदी केंद्र बंद ठेवले ही संपुर्ण माहिती गोळा करुण आम गजबे यांनी जिल्हा पनण अधिकारी तिवाडे यांना खरेदी चे गोदाम तात्काळ सुरु करा अशी सुचना करत आज शेतकऱ्यांसह गोदामला भेट देवुन शेतकऱ्या कडुन अतिरिक्त पैसे वसुल केल्यास खपवुन घेणार नाही असा ईशारा दिला या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष राजुभाऊ जेठानी सचिन खरकाटे श्याम उईके सचिन वानखेडे नरेश विठ्ठलानी चौपनदास विधाते यांचेसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

