दुचाकींना टिप्परची धडक : वानाडोंगरी व कोदेगाव परिसरातील घटना
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
प्रविण तिवाडे उपसंपादक वैनगंगा वार्ता
हिंगणा / खापा : नागपूर जिल्ह्यात मंगळवारी (दि. २९) झालेल्या दोन अपघातांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. दोन्ही अपघात टिप्परने मोटारसायकलला धडक दिल्याने झाले. पहिला अपघात सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास नागपूर- हिंगणा वानाडोंगरी परिसरात तर दुसरा खापा (ता. सावनेर) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खापा को देगाव मार्गावर सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास झाला.
मृतांमध्ये मोहम्मद आफताब मोहम्मद इस्लाम (२१) व मोहम्मद मुस्तफा मोहम्मद इस्लाम (१८) दोघेही रा. बिलनपूर (बिहार) या भावांसह लोकेश धनराज धरत (२३)
हिंगण्यात अपघाताला कारणीभूत ठरलेला टिप्पर, टिप्परने याच मोटरसायकलला धडक दिली.
व आदित्य सत्यपाल कनोजिया (२१) दोघेही रा. सावनेर या चौघांचा समावेश आहे. मोहम्मद आफताब व मोहम्मद मुस्तफा वानाडोंगरी येथे राहायचे आणि वाहन दुरुस्तीची कामे करायचे. दोघेही मंगळवारी सकाळी एमएच-४० / डी-६९१० क्रमांकाच्या मोटररसायकलने जात होते. त्यांनी यू टर्न घेताच हिंगण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या एमएच-३४/ एम-८८११ क्रमांकाच्या केले..
सावनेरजवळील अपघातातील मृत आदित्य कनोजिया व लोकेश घरत.
दोन्ही दुचाकीचालक हेल्मेटविना
या अपघातातील दोन्ही दुचाकी चालकांचा मृत्यू झाला. त्या दोघांनीही दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर केला नव्हता, अशी माहिती एमआयडीसीचे ठाणेदार ठाणेदार भीमा नरके व खाप्याचे ठाणेदार अजय मानकर यांनी दिली. खापा कोदेगाव रोडच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने रोडच्या अर्ध्या भागाने वाहतूक सुरु आहे. त्यातच दुचाकी चालकाने टिप्परला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि तो जिवावर बेतला.
टिप्परने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. दोघेही टिप्परच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. लोकेश व आदित्य एमएच-४०/केजे-८०४५ क्रमांकाच्या मोटारसायकलने सावनेरहून खाप्याला येत होते. कोदेगाव परिसरात त्यांनी समोर असलेल्या एमएच-४०/एके-८५५१ क्रमांकाच्या टिप्परला ओव्हरटेक
