जंगलात पळवून नेऊन मुलीवर अत्याचार

0
जंगलात पळवून नेऊन मुलीवर अत्याचार

दोघांना अटक

अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता

प्रविण तिवाडे उपसंपादक वैनगंगा वार्ता 

शिवणी (जि.नांदेड) : एका अल्पवयीन मुलीला जंगलात पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना किनवट तालुक्यातील शिवणी येथे घडली असून, नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या युवकास अटक केली आहे.

पीडित मुलीच्या वडिलांचा भंगार खरेदीचा व्यवसाय आहे. त्यांच्या

दुकानावर खरेदीतून जमा झालेल्या भंगार साहित्याची वाहतूक करण्यासाठी टेम्पो आहे. या टेम्पोवर काम करण्यासाठी मागील एक महिन्यापासून एक युवक कामाला होता. २७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीचे आई-वडील जेवण करीत असताना, आरोपी युवक आणि त्याचा एक मित्र मोटारसायकलवर त्यांच्या घरासमोर आला. त्याने बाहेरून आवाज दिल्याने

पीडित मुलगी घराबाहेर आली असता, तिला बळजबरीने मोटारसायकलवर बसविले. यावेळी मुलीने आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत आरोपींनी मोटारसायकल जंगलाच्या दिशेने नेली. पीडित मुलीच्या परिवारातील सदस्यांनी जंगलात मुलीचा शोध घेतला, तेव्हा २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मुलीचा शोध लागला. त्यानंतर, मुलीने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !