फुले महाविद्यालयात नॕक मूल्यांकन कार्यशाळा
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
आष्टी-. महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ३ आक्टोंबर २०२२ च्या परिपत्रकांनुसार अनुदानित सर्व महाविद्यालयांना सहा महिन्याच्या आत नॕक मूल्यांकन करून घेणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या व नॕक मूल्यांकन न झालेल्या सर्व महाविद्यालयांना विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी मार्गदर्शन करुन नॕक मूल्यांकन करणे अनिवार्य असल्याच्या सूचना दिल्या.त्या अनुषंगाने गोंडवाना विद्यापीठाच्या मानव्य विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. ए. चंद्रमौली यांनी आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाला भेट देऊन नँक मूल्यांकनाची आवश्यकता व महत्त्व पटवून देत मूल्यांकनाविषयी संस्था पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. ए. चंद्रमौली यांनी महाविद्यालयातील प्राचार्य ,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांची बैठक घेऊन महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता हमी समिती स्थापन केली. त्या अनुषंगाने प्रत्येकाला कामाची जबाबदारी सोपवून नँक मूल्यांकन करण्यासाठी प्रोत्साहित केले. वन वैभव शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष माननीय बबलू भैया हकीम सर यांना सुद्धा डॉ. चंद्रमौली यांनी आपल्या संस्थेअंतर्गत असणाऱ्या महाविद्यालयाचे नँक मूल्यांकन करणे कसे गरजेचे आहे हे पटवून देत आवश्यक त्या सोयी सुविधांचे पूर्तता करण्या विषयी सांगितले. त्यानुसार संस्था उपाध्यक्ष माननीय बबलूजी हकीम यांनी आवश्यक त्या सोयी-सुविधांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता हमी समितीच्या माध्यमातून नँक मूल्यांकनाचे कार्य मार्गी लागेल. यासाठी सर्वांनी तत्परतेने काम करावे असे मार्गदर्शन मानव्य विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ.ए.चंद्रमौली यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. संजय फुलझेले, नँक विभागाचे प्रमुख प्रा. रवी गजभिये तथा सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

