मुलाने केला बापाला कुर्हाळीने वार

0


संपादक अशोक खंडारे

सडक अर्जुनी, गोंदिया, दीं. २७ ऑक्टोंबर २०२२ : पोलीस स्टेशन डुग्गीपार अतंर्गत मौजा मोकासीटोला / रेंगेपार येथे दि. २६ ऑक्टोंबर २०२२ रोजी सायकांळी ०७ वा. दरम्यान आरोपी नरेंद्र मोतीराम कुंभरे वय ३७ वर्ष रा. मोकासीटोला / रेंगेपार यांनी घरघुती कारणावरुन भांडण करुन रागाच्या भरात स्वतःचे वडील मृतक मोतीराम टांगसु कुंभरे वय ६० वर्षे यांच्या गडयावर कुऱ्हाळीने मारुन जिवानिशी ठार केल्याने फिर्यादी गजानन मोतीराम कुंभरे वय ३५ वर्षे रा. मोकासीटोला यांचे रिपोर्टवरुन पोलीस स्टेशनला अपराध क्र. २३७ / २०२२ कलम ३०२ भादवीचा गुन्हा दाखल करण्यात आले.

सदर गुन्हयातील आरोपी नरेंद्र मोतीराम कुंभरे वय ३७ वर्षे रा. मोकासीटोला / रेंगेपार याचा तात्काळ शोध घेवुन आरोपीस अटक करण्यात आली असुन आज दि. २७ ऑक्टोंबर २०२२ रोजी आरोपीला कोर्टात पेश केले असता कोर्टाने आरोपीचा दोन दिवस पिसीआर मंजुर केला पुढील तपास ठाणेदार श्री सचिन वांगडे पो.स्टे. डुग्गीपार हे करीत आहेत.

 आपल्या परिसरातील बातम्या जाहिराती करीता संपर्क साधा 

🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
💐💐💐💐💐💐💐💐💐
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

संपादक अशोक खंडारे

गड़चिरोली जिल्हा प्रतिनिधी प्रवीण तिवाडे 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !