आष्टी ग्रामपंचायतीचे नाव मोठे दर्शन खोटे,
शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील ग्रामस्थांना स्लॅब ड्रेन नसल्याने करावी लागते कसरत
शहर स्वच्छ अभियान व तंटामुक्त पुरस्कारीत आष्टी ग्रामपंचायत असून, नाव मोठे दर्शन खोटे असल्याची परिस्थिती आहे. येथील प्रभाग क्रमांक ती 2 मधील आष्टी येथील विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर यांच्या ....... घराजवळील काही महिन्यापूर्वी वीटा ट्रक्टर जाऊन यांच्या घराजवळील स्लॅब ड्रेन तुटला असून, ते लवकरात लवकरत करण्यात यावे,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सविस्तर असे की, आष्टी शहरातील प्रभाग क्र.३ हा आजी माजी सदस्य यांचा वार्ड असून,येथील नागरिकांना ग्रामपंचायत मध्ये जावे लागत आहे हि, बाब अत्यंत नित्यांची आहे तसेच पुरस्कार पटकवलेल्या आष्टी शहर स्वच्छ अभियान मध्ये व तंटामुक्त गाव पुरस्कारीत असून नाव मोठे दर्शन खोटे अशी परिस्थिती आष्टी शहराची आहे.वार्ड क्र.३ चे सदस्य यांच्या वार्डामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून, त्यात डुकरांचा हौदोस वाडलेला आहे तसेच घराबोहती गटारी असल्यामुळे साचलेल्या सांडपाण्याचा डोहामध्ये मलेरियासारखे आजाराचे डास उपत्ती वाढली आहे.यामुळे वाड्यातील संपुर्ण नागरिक त्रासलेली आहे. यांचा बंदोबस्त न झाल्यास वार्डातील नागरिक उपोषणात बसण्याचा तयारित आहे.तसेच विस्तारितवर नमूद केलेले कामे न झाल्यास व वाड्यातील रोगराई पसरल्यास सर्वस्वी जवाबदारी ग्रामपंचायतीची राहिल तसेच या तुटलेल्या स्लॅब ड्रेन वरुन ये जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास होत आहे व काही नविन दुचाकीस्वारांना स्लॅब तुटला असल्याची माहिती नसल्याने अचानक याठिकाणी अपघात होऊन जिवितहानी होऊ शकते हे नाकारता येत नाही करीता ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन या समस्या निकाली काढण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
कोड
ग्रामपंचायत उपसरपंच सत्यशील डोर्लीकर यांना विचारणा केली असता त्यांनी कार्यरत ग्रामविकास अधिकारी यांनी राजीनामा दिल्याने सध्या ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी मंगेशकुमार वाळके यांच्या कडे पदभार आहे पण आर्थिक व्यवहार नसल्याने सदर बांधकाम करण्यास अडचण निर्माण झाली आहे आहे संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे आर्थिक व्यवहार आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी या कामाची सुरुवात करण्यात येणार आहे असे उपसरपंच यांनी सांगितले
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
बातम्या व जाहिराती करिता संपर्क साधा
वैनगंगा वार्ता
जिल्हा प्रतिनिधि प्रवीण तिवाडे


