देसाईगंज ( वडसा ) येथील ए. ए. एनर्जी थर्मल पॉवर प्लांट मध्ये विस्फोट ..एकाचा मृत्यू तर दोघे जखमी
देसाईगंज शहराला लागूनच असलेल्या ए. ए. एनर्जी थर्मल पॉवर प्लांट मध्ये आज सकाळी साडे चार च्या सुमारास विस्फोट घडून आला.यात संजय सिंग ( 30) असे मृत्य झालेल्या इंजिनीयर चे नाव आहे तर गौरव केळझरकर ( 35 ) राहणार जुनी वडसा मजूर असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.प्राप्त झालेल्या माहिती नुसार स्थानिक ए. ए. एनर्जी थर्मल पॉवर प्लांट मध्ये प्रॉडकशन लाइन वर पाहणी करण्याकरिता इंजिनीयर संजय सिंग आणि मजूर गौरव केळझरकर गेले असता याच दरम्यान सकाळी साडे चार वाजता पाहणी करीत असताना अचानक स्टीम लाइन चा विस्फोट झाला,यात स्फोटात हे दोघेही गंभीर जखमी झाले यातील इंजिनीयर संजय सिंग यांना लगेच देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले गेले असता त्यांच्या पायाच्या हाडाला दुखापत झाली असल्याने व ग्रामीण रुग्णालयात कोणताही ऑर्थो पेडिक डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात आणल्या गेले मात्र या वेळी खाजगी डॉक्टर उपलब्ध न झाल्याने जवळच असलेल्या ब्रम्हपुरी येथील डॉक्टर सावजी यांच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले व तेथे संजय सिंग यांच्यावर उपचार सुरू असताना च त्यांना हृदय विकाराचा झटका आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.तसेच गंभीर जखमी झालेल्या गौरव केळझरकर ला ब्रम्हपुरी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे असून त्यांच्या वर उपचार सुरू आहे.

